Funny: ... आणि / Funny: ... आणि वैतागून जजने वकिलांनाच दिली फाशीची धमकी, वाचा भन्नाट जोक

दिव्य मराठी वेब टीम

Jul 27,2015 10:39:00 AM IST
कोर्टात एका महिलेवर खटला सुरू असतो. योगायोगाने सरकारी वकील हे त्या महिलेच्या ओळखीचेच निघतात
वकीलः "ताई तू मला ओळखते ना?”
ताई बोलली: “हा बाबा, तू आमच्याच गावचा आहे ना.. ओळखते की..
तुझा बाप तर बिचारा एकदम साधा सरळ देवमाणूस, पण तू मात्र एक नंबरचा थापाड्या..
थापा मारून मारून साऱ्या गावाला गंडा घातला..
‘खोटे साक्षीदार’ उभे करून करून केस जिंकल्या..
सारा गाव वैतागलाय तुझ्यामुळे. गाव तर सोडच पण बायकोसुद्धा तुझ्या थापांना वैतागून पळून गेली ना तुझी..
माहितीये मला सगळं..”
वकील सुन्न झाला.. काय बोलणार..??
चल आपली तर गेलीच आता दुसऱ्याची पण घालवू असा विचार करून..
दुसऱ्या वकिलाकडे इशारा करत विचारले,
"ताई तू यांना पण ओळखत असशील?"
दुसऱ्या वकिलाकडे निट पाहत ताईने बोलायला सुरुवात केली,
“अरे हां, हा तर त्या चकण्या रामभाऊचा छोकरा ना? बापाने घरादारावर कर्ज काढून शहरात शिकायला पाठवला होता, कालिजात कोणाच्या पोरीला डोळा मारला म्हणून मरुस्तोवर हाणला होता ना? आन चार वर्षाचं कालेज सात वर्ष करीत होता म्हणले, लई नाद याला पोरींचा, तुह्या वहिनीच्या बी नादी लागला होता ना जणू..?”
सगळ्या कोर्टात हशा माजला..
जज बोलला :- "आर्डर आर्डर "
जजने दोन्ही वकिलांना बोलावून घेतले

जज :- आता जर तुमच्यापैकी कोणी ह्या ताईला विचारले कि,
" तुम्ही ह्या जज ला ओळखता का? "
तर दोघांना फाशीची शिक्षा देईन मी..
X
COMMENT