आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny: बाई उद्या तरी येताना कुंडली घेऊन ये, वाचा हसून हसून दमछान करणारा Joke

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका गांवात एक ज्योतिषी आलेला असतो...👻👻

त्याच्याकडे एक महिला जाते...

तो ज्योतीषी म्हणतो उद्या येताना तुझ्या नव-याची कुंडली घेऊन ये..
ती घेऊन जाते...🔯🔯

महिलेने आणलेली कुंडली पाहून तो सांगतो,

तुझ्या नव-याचे नांव तुकाराम आहे..
ती म्हणते व्हय महाराज !!

तो पुढे सांगतो ,
तुझ्या सास-याचे नांव गेणू होतं
ती म्हणते व्हय महाराज..

तो पुढं सांगतो ..
तुला दोन मुलं आहेत ..
मुलगा थोरला अन्
धाकटी मुलगी आहे..
ती पुन्हा म्हणते व्हय महाराज..

तो पुढे सांगतो...
तुम्ही कालच घरी गहूं आणि तांदुळ आणलेत...
मग तर ती आवाक् होऊन
त्याच्या पायांवर लोटांगण घालते
म्हणते, महाराज आपण अंतरयामी आहात...💫💫

त्यावर तो तिला म्हणतो, हे रेशन कार्ड घेऊन जा आणि उद्या तरी येताना कुंडली घेऊन ये...