आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हास्यबत्तिशी - जेव्हा पप्पूने कोंबडीवर एक निबंध लिहिला...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मला सगळेच प्राणी आणि पक्षी आवडतात. प्राणी खूप चविष्ट असतात विशेषतः "कोंबडी' जास्त चविष्ट असल्याने माझा आवडता पक्षी आहे.
कोंबडी खाल्ल्याने "बर्ड फ्लू" होतो. कोंबडी "शाकाहारी आहे, म्हणून मला तिचा आदर वाटतो. कोंबडीला दगड मारला तर तिचा "पक पकाक' असा आवाज येतो. मला तो फार आवडतो. नाना पाटेकरचा एक सिनेमाचे नाव "पक पक पकाक' असे आहे . पूर्वीचे लोक कोंबड्या चोरत असत त्यांना कोंबडीचोर असे म्हणतात. चोरी करणे गुन्हा आहे. कोंबडी "अंडे' देते, प्रत्येक कोंबडीला नेहमीच जुळी (ट्विन्स) अंडी होतात... कोंबडीचा बळी देतात. बळी देणे ही प्रथा वाईट आहे असे, माझा मित्र काल चिकन तंदुरी खाताना म्हणाला. पूर्वी "कोंबडा' आरवायचा आणि "कोंबडी' झोपून असायची,(आळशी कुठली ) कोंबडी कधी कधी "सोन्या'चे अंडे देते. मला घरी लाडाने "सोन्या' म्हणून हाक मारतात.