आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny: जेव्हा कॉलेजच्या तरूणांना भेटतो देव, वाचा भन्नाट जोक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकदा ४ महाविद्यालयीन तरुणांना देव भेटला आणि म्हणाला -"मी तुम्हाला १ कोटी रुपये दिले तर तुम्ही काय करणार ?"

पहिला - मी ते पैसे बँकेत'फिक्स डीपोझिट'मध्ये ठेवेल आणि त्याच्या व्याजावर माझा चरितार्थ चालवेल.

दूसरा - मी ते पैसे शेअर बाजारात गुंतवेल आणि'ते वाढतील'याची तरतूद करेल.

तिसरा - मी ते पैसे वापरून स्वतची कंपनी टाकेल आणि ती कंपनी हळूहळू मोठी करेल.

चौथा - मी ते पैसे लोकांमध्ये वाटून टाकील.

देव'चौथ्यावर'जाम खुश झाला आणि देवाने त्याला खरोखरच १ कोटी रुपये दिले.

*************** -*************** -*************** -*
काही वर्षांनी -

पहिला -'सामान्य माणूस' म्हणून जगला आणि शेवटी महागाईला कंटाळून त्याने आत्महत्या केली.

दुसरा - स्वकष्टाने काही पैसे कमवून ते शेअर बाजारात लावू लागला आणि नंतर शेअर दलाल झाला.

तिसरा - स्वकष्टाने काही पैसे कमवून त्याने स्वत:ची कंपनी काढली आणि आता तो एक छोटासा उद्योजक आहे.

चौथा - आज एका राज्याचा मुख्यमंत्री आहे. तो आजही पैसे वाटतो आणि त्याच्या पैसे वाटण्याच्या सोहळ्याला...... -. 'निवडणुका'असे गोंडस नाव मिळाले आहे