Home | Jokes | Daily Jokes | Santa Banta | Funny Marathi joke on Teacher and Student

Joke: विद्यार्थ्याचा प्रश्न ऐकून हैराण झाले शिक्षक, वाचा भन्नाट पोटधरून हसायला लावणारा विनोद

दिव्य मराठी वेब टीम | Update - Oct 19, 2015, 11:16 AM IST

एका शाळेत एक इंग्रजी शिक्षक खुपच फुशारकी मारत फिरत असायचे. त्यांना वाटायचं की, त्यांच्या एवढा बुध्दीमान या शाळेतच नाही. मात्र एक दिवस एका विद्यार्थ्याने त्या इंग्रजीच्या शिक्षकाना विचारले, सर 'नटुरे'चा अर्थ काय होतो?

 • Funny Marathi joke on Teacher and Student
  एका शाळेत एक इंग्रजी शिक्षक खुपच फुशारकी मारत फिरत असायचे.
  त्यांना वाटायचं की, त्यांच्या एवढा बुध्दीमान या शाळेतच नाही.
  मात्र एक दिवस एका विद्यार्थ्याने त्या इंग्रजीच्या शिक्षकाना विचारले,
  सर 'नटुरे'चा अर्थ काय होतो?
  शिक्षक हैराण झाले. त्यांनी असा शब्द पहिल्यांदाच ऐकला होता.
  प्रश्न टाळण्यासाठी ते विद्यार्थ्याला उद्या सांगतो असे म्हणाले.
  घरी जाऊन त्यांनी संपूर्ण डिक्शनरी चाळून काढली.
  मराठी-इंग्रजी, इंग्रजी-मराठी अशा दोन्ही डिक्शनरीचे पान-पान चाळले.
  मात्र कुठेच 'नटुरे' हा शब्द मिळाला नाही.
  दुसऱ्या दिवशी शाळेत जाताच त्या विद्यार्थ्याने पुन्हा त्या सरांना विचारले,
  सर सांगताय ना 'नटुरे' चा अर्थ?
  सरांनी त्या दिवशीही तो प्रश्न टाळण्याचा प्रयत्न केला.
  आता तो विद्यार्थी दररोच सरांना त्या शब्दाचा अर्थ विचारायला लागला. मात्र सरांना तो काही सापडत नव्हता.
  शिक्षक त्या मुलाला घाबरायला लागले. तो येताना दिसता की, हे शिक्षक स्वतःचा रस्ता बदलून घेत.
  मनात म्हणत, हा तर आपल्यापेक्षा हुशार दिसतोय. कसे काय उत्तर शोधून देऊ याला..
  मात्र तो विद्यार्थी रोजच सरांचा त्यांचा पाठलाग करून त्यांना त्या शब्दाचा अर्थ विचारत असे.
  एक दिवस सरांनी त्याला वैतागून विचारले, काय रे कसला शब्द तो..
  'नटुरे' च ना.. पहिले मला त्याची स्पेलिंग सांग पाहू...
  विद्यार्थ्याने सांगितले NATURE (नेचर)
  आता तर शिक्षकांचा पाराच चढला..
  शिक्षक म्हणाले, नेचर ला 'नटुरे' सांगून माझे रक्त पितोस काय..
  मला वेड्यात काढतोस काय..
  विनाकारण शिक्षकांना सतावण्यावरून तुला आता शाळेतून बाहेरच काढतो.
  हे ऐकताच विद्यार्थी त्या शिक्षकांच्या पायात पडला. दया-वया करू लागला..
  म्हणाला सर असे अनर्थ करू नका.. असा अन्याय करू नका..
  मला शाळेत राहू द्या.. नाहीतर माझा फुटुरे (Future) खराब होईल...
  शिक्षक तेव्हापासून अजूनही कोमातच आहेत..

Trending