Funny: जेव्हा बॉसने / Funny: जेव्हा बॉसने सेक्रेटरीला बाहेरगावी न्यायचे ठरवले, वाचा खळखळून हसवणारी विनोदी साखळी...

दिव्य मराठी वेब टीम

Sep 03,2015 12:49:00 PM IST
बॉसने सेक्रेटरीला फोन केला, ''एका आठवड्यासाठी आपण बाहेरगावी चाललो आहोत. त्यासाठीची सगळी व्यवस्था कर.''
सेक्रेटरीने नव-याला फोन केला,''एका आठवड्यासाठी मी बाहेरगावी जाणार आहे बॉसबरोबर.''
नव-याने प्रेयसीला फोन केला,''एका आठवड्यासाठी माझी बायको बाहेरगावी जाणार आहे. तू माझ्या घरीच राहायला ये.''
प्रेयसीने आपल्या प्रायव्हेट ट्यूशनच्या विद्यार्थ्याला फोन केला,''मी एका आठवड्यासाठी बाहेर चालले आहे. तुला ट्यूशनला सुट्टी.''
विद्यार्थ्याने आजोबांना फोन केला,''आजोबा, माझ्या ट्यूशनला आठवडाभर सुटी आहे. मला कुठेतरी घेऊन चला ना फिरायला.''
आजोबांनी (बॉसने )त्यांच्या सेक्रेटरीला फोन केला, ''हा आठवडा मी माझ्या नातवाबरोबर घालवणार आहे. बाहेरगावी जाणे रद्द.''
सेक्रेटरीने नव-याला फोन केला,''बाहेरगावी जाणे रद्द.''
नव-याने प्रेयसीला फोन केला,''आपली भेट रद्द.''
प्रेयसीने विद्यार्थ्याला फोन केला,''माझे जाणे कॅन्सल झाले आहे. तुझी ट्यूशन सुरूच राहील.''
विद्यार्थ्याने आजोबांना फोन केला,''ट्यूशन सुरूच राहणार आहे. आपलं जाणं रद्द.''
आजोबांनी (बॉसने ) पुन्हा सेक्रेटरीला फोन केला,''माझा प्लॅन बदललाय. आपण बाहेरगावी जातोय एका आठवड्याकरता...' -'....!!
X
COMMENT

Recommended News