आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

Joke: उधारी नको. आम्हाला पेशंट कमी आले तरी चालतील, वाचा पुणेरी डॉक्टराची नियमावली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे स्पेशल..!
डॉ.जोशी यांची नियमावली:

😃 उधारी अजिबात नको. आम्हाला पेशंट कमी आले तरी चालतील.

😃 लिहुन दिलेली पुर्ण ट्रिटमेंट घ्यावी. अपुर्ण उपचार घेणारे अतिशहाणे पेशंट गुण न आल्यास डॉक्टरचेच नाव बदनाम करतात.

😃 प्रत्येक आजार आमच्याकडेच बरा होइल असा काही नियम/नवस नाही. मी डॉक्टर आहे, तुमचे कुलदैवत नाही.

😃 पेशंट ने लुंगी/बनियन/बरमुडा घालुन दवाखान्यात येऊ नये. आपण चैन्नई मधे राहत नाही.

😃 सांगितलेल्या तपासण्या लवकरात लवकर कराव्या.
(तुमच्या सवडीने तपासणी केली तर आमच्या सवडीने बरे केले जाईल)

😃 एका पेशंट सोबत एकाच जबाबदार व्यक्तीने सोबत यावे. इष्टमित्र सहपरिवार यायला येथे आम्ही पंगत बसविलेली नाही. तसेच सोबत आलेल्यांनाही मध्ये-मध्ये आपल्या स्वतःच्या कंप्लेटस् सांगु नये. आपणास प्रत्येक व्यक्तीची वेगळी फी द्यावी लागेल. पुर्ण घरादाराला एकाच शुल्कात म्युन्सिपालटीच्या दवाखान्यात पण तपासत नाहित.

😃 इंजेक्शन घ्यायचे असल्यास मनाची तयारी घरूनच करुन यावी, ऐनवेळी आढेवेढे घेण्याची ही जागा नाही.

😃 कोठल्यातरी अर्धवट नातेवाईकाच्या सल्ल्याने आणलेल्या औषधी, दवाखान्यात दाखवायला आणुन त्या घेऊ का म्हणुन डॉक्टरांचा वेळ घेऊ नये.
(घरीच परस्पर खाऊन तिकडेच खपावे)

😃 कन्सलटंट कडुन तपासुन आल्यावर ती फाईल फॅमिली डॉक्टरकडे परत दाखवुन त्याचे डोके खाऊ नये. (सगळ्याच देवाचं करू, ज्याचा गुण येईल तो येईल; असं डॉक्टरबाबतीत नसतं.)

😃 डॉक्टरला बायको-मुलं आहेत, त्यानाही वैयक्तिक आयुष्य असतं, ते कुठेही सुट्टीवर जाऊ शकतात आणि ते वैयक्तिक आयुष्यात काहीही करू शकतात, त्याच्याशी तुम्ही घेणंदेणं न ठेवलेलंच बरं. (तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल डॉक्टर कधीही गाॅसीपींग करत नाहीत)

😃 कुठल्यातरी डॉक्टरकडून आलेल्या वाईट अनुभवाचा राग इतर डॉक्टरांवर काढू नये.
(इतर पेशंट्सकडून आलेल्या वाईट अनुभवाचा राग डॉक्टर्सनी पण आपल्यावर काढला, तर आपल्याला कसे वाटेल याचा विचार करावा)

😃 तुम्ही ग्राहक बनला, तर डॉक्टर दुकानदार बनेल.
तुम्ही आधी 'माणूस' बना, मग डॉक्टर अवश्य 'देवमाणूस' बनतील..!

-(ट्रिटमेंट पुरतेच) आपले
डॉक्टर.