JOKE: इमानदार मुंगीचा / JOKE: इमानदार मुंगीचा वाघ असतो बॉस, वाचा भन्नाट विनोद

दिव्य मराठी वेब टीम

Apr 06,2016 11:01:00 AM IST
एकदा एका जंगलात वाघाची फॅक्टरी होती. तिथ एकच मुंगी (सामान्य सेवक) काम करायची. ती एकटी तिच्या वेळेप्रमाणे कामावर यायची दिवसाच काम संपवून निघून जायची. वाघाचाही बिझनेस बरा चालला होता.
एकदा वाघान विचार केला कि, ही एकटीच मुंगी कोणी तिच्यावर पाहणी न करता. इतके चांगले काम करत असेल तर तिच्यावर पाहणी करणारा एखादा माणूस नेमला तर ती किती चांगला प्रतिसाद देईल.
या उद्देशाने वाघ त्याच्या फॅक्टरीत एका मधमाशीची Production Manager म्हणून नेमणूक करतो.
मधमाशीला भरपूर कामाचा अनूभव असतो. शिवाय ती रिपोर्ट लिहीण्यातही पटाईत असते. ती वाघाला म्हणते "सर्व प्रथम हिच्या येण्या-जाण्याच्या वेळा फिक्स करा. आणि हे सगळ रेकॉर्ड ठेवायला आणि कामाचा वेग वाढवायला मला एका सेक्रेटरीची गरज आहे."
मग वाघ तिचा सेक्रेटरी म्हणून सश्याची नेमणूक करतो. वाघ मधमाशीच काम पाहून खुप खुश होतो. आणि म्हणतो "आत्तापर्यंत झालेल्या कामाचा रिपोर्ट करा आणि मला त्याचा ग्राफ काढून Production Progress दाखवा"
मग त्यासाठी मधमाशी computer, projector आणि leser printer ची मागणी करते.
त्यासाठी वाघाला पुन्हा एका computer department सांभाळण्याठी एका computer head ची गरज भासते. म्हणून परत तो एका मांजराची हेड म्हणून नेमणूक करतो.
कालांतराने मुंगीला ते सारखे सारखे काम सोडून ते रिपोर्ट तयार करत बसणे. वेळवर जाणे येणे हे बंधनकारक वाटते आणि प्रोडक्षन कमी होवू लागते.

मग वाघाच्या डोक्यात येते असा एक techanical माणूस या दोघांच्या मध्ये आणला पाहिजे कि जो मधमाशीचे विचार मुंगीला व्यवस्थीत समजावून सांगेल. म्हणून तो परत माकडाला techanical instructor म्हणून नेमतो.
रोज मनात येईल तेवढच काम करणा-या आणि वेळेच्या आधि घरी जाणा-या मुंगीला हे काही आवडत नाही. तिला जास्तच राग येतो. मग वाघाचे production अजून घटते.
आपल्याला तोटा होतोय. याच कारण शोधायला वाघ घुबडाला पाठवतो. 3 महिन्याच्या सर्व्हेनंतर घुबड आपला रिपोर्ट पाठवतो.
"तुमच्याकडे कामगार वर्ग जास्त आहे तो कमी करा."
आता मला सांगा कोणाला कामावरून काढलं जाईल?
?
?
?
अर्थातच मुंगीला......
😳
Incredible india.....😄
तशीच व्यथा सर्व कंपनी मध्ये आजही आहे😂
X
COMMENT

Recommended News