आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Funny Translation Of Hindi Song In Divya Marathi

Funny: वाचा, 'दिलके टुकडे टुकडे करके मुस्कराके चल दिए'चे जिल्ह्याप्रमाणे भाषांतर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका स्पर्धा परीक्षेतील प्रश्न- "दिलके टुकडे टुकडे करके मुस्कराके चल दिए"
या वाक्याचं मराठीत भाषांतर करा.
वेगवेगळ्या सेंटरवरील विद्यार्थ्यांची नमुनेदार उत्तरे पुढीलप्रमाणे.....
विद्यार्थी-१ (पुणे)-
"ह्रदयाचे तुकडे तुकडे करुन गालावर खळीसह चालती झाली..."
विद्यार्थी-२ (नाशिक)-
"ह्रदयाची खांडोळी खांडोळी करून स्मितहास्य करत निघून गेली टवळी...!"
विद्यार्थी ३ (मुंबई)-
"दिल ब्रेक करुन वर नुस्ती एक स्माईली 😊 सेंड करुन परतीची लोकल पकडलीस"
विद्यार्थी-४ (अकोला) -
"मनाचा बुकना बुकना करून दात ईचकुन निंगुन गेली"

विद्यार्थी-५ (अमरावती)
"कलिजाचे मार कुटके कुटके केले माह्या, अन दातकाड काहाडत कुठं चाल्ली वं !"
विद्यार्थी-६ (यवतमाळ)-
"निरे तुकळे केलेना हिर्दयाचे, न वरुन जाता जाता बत्तिशी दाखुन राह्यली..आं !!
विद्यार्थी-७ (वाशिम)-
"कायजाच्या पार चिंध्या करून टाकल्या माहया, अन हेंबाडथुत्री दातकड विचकत जाऊन राहाली"
विद्यार्थी-८ (बुलढाना)-
"लांग चिथडे करुन माया कायजाचे वरुन लय दातं इचकून रहाली तु तं.. आन चाल्लि लगे..."
विद्यार्थी ९ (वर्धा) -
बाप्पा📢 !!! पार चिटोरे चिटोरे केले पोट्टिन कायजाचे अन बगा कशी जाऊन रायली फिदिफिदी हासंत"
विद्यार्थी १० (औरंगाबाद)
"दिल 💔 ची बोटी बोटी करुन गालात हासत हासत च्याल्ली न बे ..."