आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKES: महाराज गडावर पोचले. आता मेलात तरी चालेल, वाचा भन्नाट पुणेरी विनोद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
🔘 पुणेरी विनोद 🔘
🌸एक बाळ जन्माला आल्या-आल्या बोलायला लागतो.
तो नर्सला विचारतो, खायला काय आहे?
नर्स : पोहे आणि उपीट तयार आहे...
मुलगा: अरे देवा! परत पुण्यातच जन्माला आलो....!!
🔷🔷🔷🔷🔷🔷

🌸एक पुणेरी मुलगा आपल्या मित्रांना घरी घेऊन आला आणि म्हणाला, " थांबा मी चहा घेऊन आलो..."
१० मिनीटांनी, " चला माझा चहा घेऊन झाला आपण आता जाऊया!
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

🌸स्थळ : सदाशिव पेठ, पुणे.
जोशीकाका : काय तात्या, आज अगदी आनंदात दिसता आहात ! काय झालं ?
तात्या : अहो, आमच्या शेजारच्या कुलकर्ण्यांना १ लाख रुपयाची लॉटरी लागलीये!
जोशीकाका : मग तुम्हाला का इतका आनंद झालाये ?
तात्या : त्याला आता तिकिट सापडत नाहीये !
🔷🔷🔷🔷🔷🔷🔷

🌸स्थळ: (पुण्याशिवाय दुसरे असू शकत नाही.)
पेशंट:- डॉक्टर,प्लास्टिक सर्जरी करायची आहे, साधारण किती खर्च येईल?
डॉक्टर:- ३ लाख रुपये.
पेशंट (थोडा विचार करून):- आणि प्लास्टिक आम्ही आणून दिले तर?
🔷🔷🔷🔷🔷🔷🔷

स्थळ : पुणे
एक मुलगा सायकलवरुन जाताना, एका मुलीला धडकला....!!
मुलगी: बावळट.. ब्रेक नाही का मारता येत...?
मुलाचे पुणेरी उत्तर: अख्की सायकल मारली, आता काय ब्रेक वेगळा काढून मारु..!!!.
पुणेरी एकदम तिखट....
🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷

🌸पाहुणा : अहो Camp ला जायला कुठली बस पकडू ?
पुणेरी : २० Number ची पकडा.
पाहुणा : आणि ती नाही मिळाली तर?
पुणेरी : १० - १० च्या २ पकडा.
🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷

🌸पुण्याला डेक्कनच्या चौकात CCTV कॅमेरे बसवले. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिस कंट्रोल-रूमला आलेला पहिला फोन:
"अहो, जरा कॅमेरात बघून सांगा ना, चितळे उघडले आहेत का.?"
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

पुणेरी स्पेशल
चिंटूः बाबा मला ब्लॅकबेरी नाही तर अॅप्पल पाहिजे.
बाबाः घरात फणस आणलाय तो संपव आधी...
🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷

🌸**पुणेरी स्पेशल
बायको: अहो काल डॉक्टर मला सांगत होते की, माझा 'बीपी' वाढलाय! पण बीपी म्हणजे काय हो सांगा ना?
नवराः अगं 'बीपी' म्हणजे 'बावळट पणा'
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

🌸** भन्नाट पुणेरी
बाळूः काकू, चिंटू आहे का घरी?
जोशी काकूः आहे ना, गरमा-गरम पोहे खातोय. तुलापण भूक लागली असेल ना?
बाळूः हो
जोशी काकूः मग घरी जा आणि काहीतरी खाऊन ये...
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

नवरा थकलेला, ऑफिसमधुन घरी आलेला असतो..
नवरा: प्यायला पाणी आण ग?
बायको: तहान लागली आहे का ?
नवरा (संतापून): नाही माझा गळा कुठुन लिक होतोय ते चेक करायचा आहे.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

🌸पुणेरी राँग नंबर
अः देशपांडे आहेत का?
बः (चिडून) पावनखिंड लढवायला गेलेत. काही निरोप?
अः त्यांना म्हणाव, महाराज गडावर पोचले. आता मेलात तरी चालेल!
बातम्या आणखी आहेत...