joke : वटपोर्णिमा / joke : वटपोर्णिमा स्पेशल जोक्स, व्हॉट्सअपवर व्हायरल होत आहेत असे विनोद

joke : वटपोर्णिमा स्पेशल जोक्स, व्हॉट्सअपवर व्हायरल होत आहेत असे विनोद.

Jun 27,2018 09:57:00 AM IST

व्हॉट्सअपवर आणि सोशल मीडियावर कोणत्याही प्रसंगाचे जोक्स व्हायरल होत असतात. वटपोर्णिमेच्या निमित्तानेही असेच काही जोक्स व्हायरल होत आहेत. हे जोक्स आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


सासु - अगं सुनबाई उठ लवकर. आज
वटपौर्णिमा वडाची पूजा नाही करायची का ? सुन - मला जाम कंटाळा आलाय. घरीच करते पूजा.....
माझा लैपटॉप आणा बरं इकड़...
(सुनबाई टाइप करते) डबल्यू डबल्यू डबल्यू डॉट वडाचंझाड
डॉटकॉम...
ऑनलाइन वडाची पूजा सुन:- - माझे फेरे घालते...
वन, टू, थ्री, फोर, फाइव, सिक्स , सेवेन....
आता
तुमचे एक, दोन , तिन , चार, पाच , सहा, सात...
झाली एकदाची वडाची पूजा...!!!
सासु - माझेग कशाला घातले फेरे ....?
तुझे सासरे जावून ३ वर्ष झाले की ग आता .... सुन - अय्या खरचं की...sorry हं....undo करते... !!!

दूसरा जोक असा...
मागच्या वर्षी मी बसमध्ये
दोन स्त्रियांमधली ऐकलेली चर्चा.
त्यातली एक दुसरीला सांगत होती -
"अगं, काल (वटपौर्णिमेच्या दिवशी) मला
रजाच मिळाली नाही.
शेवटी मी आमच्या कामवालीला सांगितलं,
जा गं जरा माझ्या वाट्याच्या
चकरा तू मार गं वडा ला ह्या वर्षी.
ती पण बिचारी गेली गं बाई आणि
आनंदाने चकरा मारून आली.
अश्या कामवाल्या मिळायला पण भाग्य लागतं गं. "

X