आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सासूने घेतली जावयांची परीक्षा... अन् घडले भलतेच काही तरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका महिलेला तीन जावई असतात.

जावयांना आपल्याबद्दल काय वाटते हे जाणून घेण्यासाठी ती त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवते.
पहिल्या जावयाला घेऊन ती नदीवर जाते
आणि नदीमध्ये उडी मारते.
पहिल्या जावयाने तिला वाचवले.
सासूने त्याला मारुती कार घेऊन दिली.
दुसऱ्या दिवशी सासू तलावाच्या ठिकाणी दुसऱ्या जावयाला घेऊन जाते आणि तलावात उडी मारते.
दुसर्‍या जावयानेही तिला वाचवले. सासूने त्याला बुलेट घेऊन दिली.
2 दिवसानंतर तिसऱ्या जावयासोबत सासूने तसेच केले...
जावायाने विचार केला की, मला आता सायकलच मिळेल...
यांना आता वाचवण्यात काय फायदा आणि तो सासूला वाचवण्याचा प्रयत्न करत नाही.
सासूचा पाण्यात बुडून मृत्यू होतो.
परंतु पुढच्या दिवशी तिसर्‍या जावयाला मर्सिडीज कार मिळाली.
विचार करा... हा चमत्कार कसा झाला...?
?
?
?
?
?
?
" अरे, सासर्‍याने दिली..! "

होऊ दे खर्च☺

बातम्या आणखी आहेत...