Home | Jokes | Daily Jokes | Other Jokes | Funny conversation between bramhin and Yamdut

Funny: ...स्वर्गात मान न मिळाल्याने भटजींना आला राग, वाचा आणि पोट धरून हसा

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 23, 2015, 10:29 AM IST

एक ब्राम्हण मरतो. त्यानंतर त्याचा आत्मा स्वर्गाच्या दारावर जातो. तिथे मोठी लाईन असते. यमदूत प्रत्येकाच्या योग्यतेनुसार त्याला स्वर्गामध्ये स्थान देत असतो.

 • Funny conversation between bramhin and Yamdut
  एक भटजी मरतो. त्यानंतर त्याचा आत्मा स्वर्गाच्या दारावर जातो. तिथे मोठी लाईन असते. यमदूत प्रत्येकाच्या योग्यतेनुसार त्याला स्वर्गामध्ये स्थान देत असतो.

  भटजींच्या समोरच एक काळा चष्मा लावलेला, जिन्स, लेदरचे शुज, टीशर्ट घातलेला मुलगा उभा असतो.

  यमदूतः तु कोण आहेस?

  मुलगाः मी एक बस ड्रायव्हर आहे.

  यमदूतः हे घे सोन्याची शाल आणि आत तुझ्यासाठी सोन्याच्या महलातील एक खोली आहे. तिथे जाऊन राहा.

  त्यानंतर भटजीची पाळी येते.

  यमदूतः तु कोण आहेस?

  भटजीः मी एक भट आहे. तसेच मागील ४० वर्षांपासून मी लोकांना देवांबद्दल सांगत आलो, त्यांच्याकडून पोथी पुराणांचे पठन करून घेतले. वेदांचे ज्ञान त्यांना सांगितले.

  यमदूतः ही घे सुती शाल. आणि आत तुझी एका कुटीमध्ये व्यवस्था केली आहे.

  भटजीः हे अत्यंत चुकीचे आहे. त्या ड्रायव्हरने अत्यंत वेगात गाडी चालवत आयुष्य घालवले, तरी त्याला सोन्याची शाल आणि खोली. आणि मी संपूर्ण आयुष्य देवाच्या नाम स्मरणात, वेद पठणात घालवले तर मला फक्त सुती कपडे. असे का देवा..

  यमदूतः वत्सा हे आहे परिणाम..

  जेव्हा तु लोकांना धर्माचे शिक्षण देत होता. तेव्हा सर्व भक्त झोपत होते. मात्र तो ड्रायव्हर जेव्हा वेगाने गाडी चालवत होता तेव्हा सर्व प्रवासी अगदी अतःकरणापासून माझी आठवण काढत होते.

  लक्षात ठेवा नेहमी Performance लक्षात घेतली जाते Position नाही.

Trending