आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Joke: बाई तूम्ही मला ओळखता का?, वाचा आणि पोट दुखेपर्यंत हसा..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकदा एका खटल्यात साक्ष देण्यासाठी गावातल्या एका “बाई” ना बोलावले गेले.
बाई येऊन उभी राहिली कोर्टात. दोन्ही बाजूंचे वकील पण बाईच्या गावचेच होते.
वकील बोलला, "बाई तूम्ही मला ओळखता का?”
बाई बोलली, “हा बाबा, तू आमच्याच गावचा आहे ना.. ओळखते कि.. तुझा बाप तर बिचारा एकदम साधा सरळ देवमाणूस, पण तू मात्र एक नंबरचा थापाड्या.. थापा मारून मारून साऱ्या गावाला गंडा घातलास.. ‘खोटे साक्षीदार’ उभे करून करून केस जिकल्या.. सारा गाव वैतागलाय तुझ्यामुळं, गाव सोड बायको सुद्धा तुझ्या थापांना वैतागून पळून गेली ना तुझी.. माहितीये मला सगळं..”
वकील सुन्न…. काय बोलणार..??

चला आपली तर गेलीच आहे आता दुसऱ्याची पण घालवू असा विचार करून..
दुसऱ्या वकिलाकडे इशारा करत विचारले, "ताई तू यांना पण ओळखत असशील?"
दुसऱ्या वकिलाकडे निट पाहत ताईने बोलायला सुरुवात केली, “अरे हां, हा तर त्या रामभाऊचा छोकरा ना? बापाने घरादारावर कर्ज काढून शहरात शिकायला पाठवला होता, कालिजात कोणाच्या पोरीला डोळा मारला म्हणून मरुस्तोवर हाणला होता ना? आन चार वर्षाचं कालेज सात वर्ष करीत होता म्हणले, लई नाद याला पोरींचा, तुह्या बायकोच्या बी नादी लागला होता ना ह्यो..?”
सगळ्या कोर्टात हशा माजला…
जज बोलला, "ऑर्डर ऑर्डर"
जजने दोन्ही वकिलांना बोलावून घेतले
जज: आता जर तुमच्यापैकी कोणी ह्या बाईला विचारले कि, तुम्ही ह्या जज ला ओळखता का? तर मी दोघांना बुटानं मारीन...
Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser