Funny: बापाने लिहिले / Funny: बापाने लिहिले तुरूंगातील मुलाला पत्र, वाचून तुम्हालाही खळखळून हसायला येईल...

Sep 08,2015 10:34:00 AM IST
एका पित्याने येरवडा जेल मध्ये बंद असणाऱ्या आपल्या मुलाला पत्र लिहिले.📝📝
"बाळा मला शेतामध्ये बटाटे पेरायचे आहेत. मी आता खूप थकलोय. मी शेत नांगरू शकत नाही. जर तु असता तर किती बरं झाले असते. आता मला एकट्यालाच शेत नांगरावे लागणार.."
मुलाने पत्र लिहीले 📝📝
बाबा तु वेडा आहेस काय? शेत-बित काय खोदू नको.. मी शेतात माझी हत्यारे, आणि पैसे लपवून ठेवली आहेत. 🔪🔫💣🔨💣💣🔫🔫 ती जर पकडली गेली तर मी कधीच तुरूंगाबाहेर येऊ शकणार नाही".
पत्र पाठवताच दुसऱ्या दिवशी पोलिस ट्रॅक्टर घेऊन त्याच्या शेतावर हजर. पोलिसांनी त्यांचे संपूर्ण शेत नांगरून काढले, खोदले परंतु त्यांना काहीच सापडले नाही.
त्यानंतर मुलाने बापाला परत एक पत्र पाठवले..
"बाबा तुम्ही आता खुशाल बटाटे लावा.. मी जेलमधून तुमची एवढीच मदत करु शकतो."
X

Recommended News