'होणार सुन मी या घरची' या मालिकेतील जान्हवीच्या डेलेवरीच्या विषयाने सर्वच महाराष्ट्र परेशान झाला आहे. त्यामुळे याविषयीचे विविध जोक्स फेसबुक, ट्वीटर आणि व्हॉट्सअप अशा सोशल नेटवर्कींगवरून मोठ्या प्रमाणात शेअर होत आहेत. नुकताच व्हॉट्सअपवर मोठ्या प्रमाणात शेअर होत असलेला जोक म्हणजे, 'जानवीच्या डेलेवरी हा आता राज्याचाच नव्हे तर राष्ट्रीय प्रश्न बनला आहे. त्यामुळे आता सर्वच स्तरातून याविषयी बोलले जात आहे. यातच आता विरोधकांनीही सरकारविरोधात आवाज उठवायला सुरूवात केली आहे.' यामध्ये प्रत्येक पक्षाचा अध्यक्ष जानव्हीच्या डिलेवरीविषयी मत मांडताना दिसत आहे.. त्याच प्रतिक्रिया आम्ही ग्राफीक्सच्या रुपाने तुमच्यासमोर मांडत आहोत. या प्रतिक्रिया वाचून तुम्ही खळखळून हसाल तसेच इतरांनाही ही बातमी शेअर कराल हे मात्र नक्की...
लक्षात असू द्या, हा फक्त विनोदाचा भाग आहे. याचा कोणत्याही पक्षाच्या अध्यक्षाशी अथवा कार्यक्रमाशी काहीही एक संबंध नाही.
पुढील स्लाईडवर वाचा, महाराष्ट्रातील राजकारण्यांच्या जान्हवीच्या डिलेवरीविषयीच्या भन्नाट हसवणाऱ्या प्रतिक्रिया...