JOKES: मी आजपासून / JOKES: मी आजपासून पिणे सोडले आहे, तुम्हाला आहे का असा मित्र..

Apr 18,2016 01:46:00 PM IST
एकदा एक माणूस एका बारमधे जातो व तीन बीयरचे ग्लास मागवतो .
तो तिन्ही ग्लास मधून थोडी थोडी बीयर पीत रहातो...
बार मालकाला रहावत नाही, तो असे पिण्याचे कारण विचारतो...
तो माणूस सांगतो...
आम्ही तिन जिवलग मित्र आहोत. सध्या वेगवेगळया जागी रहात आहोत. सोबत पिण्याची आठवण म्हणून आम्ही तिघेही असेच पितो..
असे बरेच वर्ष चालते.
एक दिवस तो माणूस दोन बीयरचे ग्लास 🍺🍺 मागवतो...
बार मालकाला शंका येते की एखादा मित्र वारला की काय ?
तो त्या माणसाचे सांत्वन करु लागतो.
त्यावर तो माणूस म्हणतो...
" अरे तसे काही नाही.... दोघेही ठणठणीत आहेत... "
बार मालक : मग आज दोनच ग्लास 🍺🍺 का ?
माणूस : मी आजपासून पिणे सोडले आहे..
🍺😜अशी मैत्री असावी😜🍺
X