JOKE: कामधंदा काही / JOKE: कामधंदा काही नाही, नाटकच पाहा यांचे, वाचा पोट धरून हसवणारा विनोद

Jan 09,2017 12:17:00 PM IST
एक मुलगा हट्ट धरून बसला, म्हणाला मला हिरवी मिरची खायची आहे.
घरच्या लोकांनी त्याला खुप समजावले, मात्र तो ऐकायला तयार नव्हता...
शेवटी वैतागून घरच्यांनी त्याच्या शिक्षकांना बोलावले.
हे शिक्षक मुलांचे हट्ट तोडण्यात पटाईत होते...
शिक्षक म्हणाले, "मिरची मागतोय ना तो, द्या त्याला मिरची..."
शिक्षकांच्या आदेशानुसार मिरची मागवण्यात आली...
मिरचीने भरलेली प्लेट त्या मुलासमोर ठेवली आणि शिक्षक म्हणाले, " खा तुला जेवढी खायची आहे तेवढी..."
मुलगा चवताळला.. म्हणाला.. "मला तळलेली मिरची हवी.."
शिक्षकांनी मिरची तळून आणण्यास सांगितली...
तळलेल्या मिरचीची प्लेट मुलासमोर ठेवली आणि शिक्षक म्हणाले, " खा आता चुपचाप..."
मुलगा जमीनीवर लोळू लागला, म्हणाला "मला अर्धी-अर्धी मिरची हवी खायला..."
शिक्षकांनी सर्व मिरच्यांचे अर्धे-अर्धे असे तुकडे केले... आणि त्या मुलाला खायला दिले...
मुलगा म्हणाला, सर पहिले तुम्ही खा.. मगच मी खाईल...
शिक्षकांना वैताग आला.. तरीही त्यांनी एक मिरचीचा तुकडा उचलला आणि डोळे बंद करून तोंडात टाकून आणि गिळून घेतला...
शिक्षकांनी जशी मिरची गिळली, तोच मुलगा मोठ्या-मोठ्याने रडू लागला...
तो म्हणाला.. तुम्हीतर मला हवा असलेला मिरचीचा तुकडा खाल्ला आहे...
मुलाचे बोलणे ऐकताच, शिक्षकांनी पळ ठोकला...
काम-धाम काही नाही, आणि नाटकंच पाहा यांचे नुसते...
आता तो मुलगा मोठा होऊन.. अरविंद केजरीवाल नावाने प्रसिध्द झाला आहे...
X