Joke: बंड्याचे उत्तर / Joke: बंड्याचे उत्तर ऐकून शिक्षक झाले बेभान, वाचा भन्नाट जोक..

दिव्य मराठी वेब टीम

Oct 26,2015 12:14:00 PM IST
मास्तर : बंड्या सांग बर, पुण्याला विद्येचे माहेरघर का म्हणतात?
बंड्या : विद्याचा जन्म पुण्यातला, जशी ती मोठी झाली तसे तिच्यासाठी उचित वर शोधण्याचे प्रयत्न सुरु झाले. 
'विद्या विनयेन शोभते', म्हणून मग विनयचा शोध सुरु झाला. 
आता पुणेकरांकडे 'विनय' असणं अशक्यच. तेव्हा अखेर पुण्याबाहेरील विनयशी लग्न करुन विद्या पुण्याबाहेर गेली. 
मात्र तरीही माहेर पुण्याचच असल्याने पुण्याला विद्येचे माहेरघर म्हणतात!
मास्तरांनी 'विनय' सोडुन बंडयाला धुतला!!!
X
COMMENT

Recommended News