आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Funny Student And Teacher Jokes In Divya Marathi

FUNNY: एकदा शाळेत मास्तर पप्पूचा पेपर तपासताना बेशुद्ध पडले, कारण की...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकदा शाळेत मास्तर पप्पूचा पेपर तपासताना बेशुद्ध पडला.
कारण, पप्पूने उत्तरेच तशी लिहिली होती.

प्रश्न 1. कोणत्या युद्धात टिपू सुलतान मारला गेला ?
उत्तर - त्याच्या शेवटच्या युद्धात.
प्रश्न 2. भारत स्वातंत्र्याच्या करारावरती सह्या कोठे
झाल्या ?
उत्तर- लिहून झाल्यावर शेवटी.
प्रश्न 3. घटस्फोट का घेतला जातो ?
उत्तर - लग्न झालेले असते म्हणून.
प्रश्न 4. गंगा नदी कोणकोणत्या राज्यातून वाहते ?
उत्तर - जेथे पातळ लोकवस्ती आहे तेथून.
प्रश्न 5. महात्मा गांधीजींचा जन्म कधी झाला ?
उत्तर - त्यांच्या वाढदिवसा दिवशी.
प्रश्न 6. आठ आंबे सहा लोकांना बरोबर कसे वाटणार ?
उत्तर - आमरस करून.
प्रश्न 7. भारतात जास्त बर्फ कोठे पडतो ?
उत्तर - दारूच्या ग्लास मध्ये.

प्रश्न 9. रावण हा कोण होता ?
उत्तर - शाहरुख खान.
प्रश्न 10. मायकल जॅक्सन कोण होता?
उत्तर - माणूस .