आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Funny : इतने दिन देखी मैंने मंत्री पद की वाट... अब देखो मेरा थाट, वाचा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोशल मीडिया असो की, प्रिंट, इलेक्‍ट्रानिक आणि डिजिटल मीडिया या सर्वांमध्‍ये रामदास आठवले कायम चर्चेत असतात. मंगळवारी त्‍यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com सांगणार आहे त्‍यांच्‍या नावाखाली व्‍हायलर होत असलेल्‍या विनोदी कवितांविषयी खास माहिती...
लोकनेता म्‍हणून ख्‍याती
‘रिपाइं’चे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांचे लहानपण अंत्‍यत प्रतिकुल परिस्‍थितीत गेले. त्‍यामुळेच या लोकनेत्‍याची नाळ अजूनही समाजासोबत जुळलेली आहे. लोकनेता म्‍हणून त्‍यांची ख्‍याती आहे.
आठवले शिघ्रकवी म्‍हणून लोकप्रिय
खासदार आठवले हे जसे चित्रविचित्र वेशभूषेसाठी प्रसिद्ध आहेत तसेच ते शीघ्रकाव्यासाठीही प्रख्यात आहेत. गल्लीतल्या सभांपासून ते संसदेतील भाषणांपर्यंत आठवलेंच्या शीघ्रकविता सर्वांच्या ओठावर असतात. आपल्या नेत्याच्या या चारोळ्यांना जे कार्यकर्ते आजपर्यंत टाळी देत होते, तेच कार्यकर्ते आता त्‍यांच्‍या नावाखाली पोस्‍ट केल्‍या जात असलेल्‍या काव्याला वैतागले आहेत. त्यामुळे आठवलेंच्या नावे सोशल मीडियावर विडंबन करणाऱ्यांना बघून घेण्याचा इशाराही रिपाइंने दिला होता.
निवडणुकीच्‍या काळात मिळाली विशेष प्रसिद्धी
निवडणूक प्रचारसभांमध्ये आठवलेंच्या चारोळ्यांना विशेष प्रसिद्धी मिळाली. पण, काही व्‍यक्‍ती मुद्दाहून आचरट कविता करून त्‍या त्‍यांच्‍या नावाने सोशल मीडियातून प्रसिद्ध करत आहेत. ‘सहज आठवले’ नावाने अनेक शीघ्रकवी मोठ्या संख्येने कवितांचा रतिब घालत आहेत. नेमकी हीच गोष्ट रिपाइं कार्यर्त्यांना डाचते आहे. त्यामुळे वैतागून रिपाइंच्या युवक आघाडीने नुकतेच एक पत्रक जारी केले असून, ‘शीघ्रकवींनी रामदास आठवले यांच्या काव्याचे विडंबन थांबवावे; अन्यथा त्यांचा रिपाइं स्टाईलने बंदोबस्त केला जाईल’, असा इशारा प्रसिद्धी पत्रकात दिला आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा, ‘सहज आठवले’ नावाने प्रसिद्ध झालेल्‍या काही कविता...
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, आठवलेंच्‍या नावाखाली व्‍हायरल झालेल्‍या विनोदी कविता....
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...