आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

LFW : लॅक्मे फॅशनवीकमध्ये बॅग्जचाही जलवा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आत्तापर्यंत लॅक्मे फॅशन वीकमध्ये कपडे आणि ज्वेलरी दाखवण्यात आली पण, अक्की नरूलाने त्याच्या हटके अंदाजात हॅन्ड बॅग्जला 'सेकंड स्किन' अंदाजात सादर केले. या शोमध्ये बॅग्जला आकर्षित पध्दतीने सादर करता यावे यासाठी सगळ्या मॉडेल्सला ग्रे आणि ब्लॅक लुकमध्ये रॅम्पवर उतवण्यात आले होते. सगळ्याच मॉडेल्सने रॅम्पवर एकाहुन एक बॅग्जची डिझाइन्स दाखवले.
अक्की नरूलाने शोमध्ये शानदार डिझाइन सादर केल्या. सगळ्याच मॉडेल्सचे ड्रेसेस ग्रे आणि ब्लॅक लुकमध्ये होते. पण, त्यांच्या हातात असलेल्या वेगवेगळ्या रंगीत बॅग्जमुळे त्यांचा लुक खुप आकर्षक दिसत होता. मॉडेल्सचे ड्रेसेस एकसारख्याच पध्दतीने दाखवण्यात आले होते, पण प्रत्येक मॉडेल्सच्या डोळ्या खालच्या वेगवेगळ्या मेकपमुळॆ एक वेगळा लुक बघायला मिळाला.