आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Gaurang Shah And Payal Kapoor Collection Shows Banaras And Punjab Style

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॅक्मे फॅशन विकच्या या शोमध्ये दिसली बनारस आणि पंजाबची झलक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॅक्मे फॅशन विकचा तिसरा दिवस 'इंडियन टेक्सटाइल डे' म्हणून साजरा करण्यात आला. गौरंग शाह यांच्या शोने या दिवसाची सुरुवात झाली. ज्यामध्ये अनेक सुंदर इंडियन ड्रेस पाहण्यास मिळाले. साडीच्या व्यतिरिक्त अनारकली आणि घागरा कलेक्शन पाहण्यास मिळाले. हे सुंदर ड्रेस विशेषतः भारतीय मॉडर्न वधू जास्त पसंत करतील. श्रृति संचिता यांच्या शोमध्ये भारतीय ड्रेसमध्ये सिल्क आणि रंगांमध्ये पिवळा, नारंगी, लाल आणि गुलाबी हे रंग पाहण्यास मिळाले.
रविवारी म्हणजे 'इंडियन टेक्सटाइल डे'चा दुसरा शो पायल कपूर यांचा होता. बनारसच्या डिजाइन्सला समर्पित करीत पायलने आपला शो एकदम खास केला. पायलच्या कलेक्शनमध्ये ग्रीन, ब्लॅक, आणि वाईन रंगाची धोती स्टाइल पाहण्यास मिळाले.
या शोची सुरुवात शोल्डर ड्रैप्ड प्रिंटेड रेड मिनीने झाली. शोटॉपर होती मिनी माथुर तिने रिच गोल्ड जरदोरी वर्क असलेला लेहंगा-चोली आणि ओढणी घेतली होती. या शोमध्ये पंजाबची झलक पाहण्यास मिळाली.
शो कव्हर करत आहेत आमचे खास रिपोर्टर मार्सेल्स बॅप्टिस्टा. जे लाईफस्टाईलशी निगडित कार्यक्रमांवर लिहित असतात. आयुष्यात जे काही चांगले घडेल त्यावर मला लिखाण करायला आवडते असे बॅपिस्टा यांनी सांगितले. बॅपिस्टा फॅशन वीकचे dainikbhaskar.com साठी रिपोर्टिंग करत आहेत.