आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
लॅक्मे फॅशन वीक विंटर/फेस्टिवल 2012 च्या दुसर्या दिवशी चार डिझायनर्सने सादर केलेल्या अप्रतिम कलेचे प्रदर्शन बघायला मिळाले. विशेष म्हणजे या शोसाठी उपस्थित लोकांनी याला पसंती देखील दिली. फॅशन डिझायनिंगमध्ये आपल एक विशेष स्थान प्राप्त करणारी आरतीविजय गुप्ताने व्हाइट-ब्लॅक कॉन्ट्रास्ट डिझाइन्स आकर्षक पध्दतीने सादर केले.
निखील थांपीने त्याचे 'सरव्हावर्स लाईन कलेक्शन असलेल्या सिल्क टॉप आणि चोली यांचे सादरीकरण केले. यावेळी थांपीने मेटॅलिक रंगाच्या मदतीने चेन आणि प्लेट्स वर्क असलेले ड्रेसेस देखील लॉन्च केले. तसेच, लेदर स्ट्रेप्स कलेक्शन देखील त्याच्या कलेतून दिसून आले.
फॅशन वीकच्या या इव्हेंटमध्ये डिझायनर सिध्दार्थ आर्यनने 'वॉन्डरलस्ट कलेक्शन्स' सादर केले. उच्च प्रतिच्या या डिसाईन्समधून भारतीय शैलीची खास डिझाइन्स पहायला मिळाली.
योगेश चैधरीच्या डिझाइन्समधून अमेरिकेच्या रिंटो एराची खास झलक दिसली. चेरी रेड, कॅनरी यलो आणि इलेक्ट्रिक ब्लू यांसारख्या रंगाचा वापर करून त्याच्या कलेक्शन्सच्या डिझाइनन्समध्ये आणखी आकर्षण आणले. योगेशच्या डिझाइन्समध्ये ब्लॅक प्रिंटिंग, बीड वर्क, डिजीटल प्रिटिंग आणि नेटेडचा खास लूक नजरेस पडला. यामध्ये स्कर्ट, ट्राउझर्स, जॅकेट, ब्लाउजेस, साडी आणि स्विमवेअर यांचा सामावेश होता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.