आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

LFW 2012 : शेवटच्या दिवशी डिझायनर्सचा उत्साह शिगेला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज (७ ऑगस्ट) लॅक्मे फॅशन वीकचा शेवटचा दिवस आहे. ५ दिवस चालणा-या लॅक्मे फॅशन वीकमध्ये वेगवेगळ्या कलेक्शन्सने चांगलेच रंग भरले. या शोच्या शेवटच्या दिवशी डिझायनर्सचा उत्साह शिगेला पोहचलेला दिसला.

शेवटच्या दिवशी रितिका भरवानीने आपले कलेक्शन सादर केले. रितिकाने आपल्या या शोचे नाव ‘Midnight Soiree’ असे ठेवले होते. रितिकाने 'उषा लेबल'च्या अंतर्गत आपले हे कलेक्शन सादर केले. या शोची प्रेरणा कंटेपरेरी आर्किटेक्चरपासून घेण्यात आली होती. या शोमध्ये खूप स्टायलिश ड्रेसेस पाहायला मिळाले. यामध्ये सेपरेट्स, जंपसुट्स आणि गाऊनचा समावेश होता. या स्टायलिश ड्रेसेसमध्ये शेंदरी रंगापासून ते इलेक्ट्रिक ब्लू शेड्स पाहायला मिळाले. शिवाय रितिकाच्या या कलेक्शनमध्ये गोल्डन कलरचाही टच दिसला.

डिझायनर करिश्मा शाहनीनेही आपले कलेक्शन सादर केले. 'चौराहा लेबल' अंतर्गत करिश्माने आपले कलेक्शन सादर केले. या शोचे नाव होते 'सिल्क रुट'. करिश्माहा हा शो कलरफूल होता. करिश्माने आपल्या कलेक्शनमध्ये जॅकेट्स, स्कर्ट्स, ट्युनिक, ब्लेजर पाहायला मिळाले. या कलेक्शनमध्ये बोल्ड यलो, स्काय ब्लू आणि पिकॉक ग्रीन या रंगांचा वापर करण्यात आला होता.