आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॅक्मे फॅशन वीकमध्ये दिसले नाविन्यपूर्ण कलेक्शन

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॅक्मे फॅशन वीकच्या शेवटच्या दिवशी अमृता ठाकूर यांचा शो म्हणजे आकाशात चमकणाऱ्या चांदण्यासारखा होता. एका नाजूक पारंपारिक समकालीन पद्धतीत विविध रंगात त्यांनी आपले कलेक्शन सादर केले. एक शिफॉन कुर्ता आणि एम्ब्रोडरी केलेली चोळी घातलेल्या मॉडेलने सर्वांचे लक्ष आकर्षित करून घेतले. डिझायनर नेट, शिफॉन, नारंगी रंगात हिरवा रंग, मेहंदी रंग असे अनेक प्रकारचे रंग त्यांच्या कलेक्शनमध्ये दिसून आले.
निष्का लुल्ला यांनी आधुनिक काळातील महिलांसाठी तयार केलेले कलेक्शन सदर केले. नवीन युगातील उत्साही मुलींसाठी त्यांनी डिझाइन केलेल्या कलेक्शनवर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले होते. अंगरखे, मिडी स्कर्ट, जॅकेट्स आणि दोन साड्या असे कलेक्शन त्यांनी सादर केले.
प्रशांत चौहान यांचा शो उत्तराखंडच्या घाटातील सुंगधीत फुलांच्या रूपातील होता. उत्तराखंडच्या सौंदर्याला सलामी देणारा हा शो होता. निळ्या रंगावर आधारित थ्रीडी आणि फुलपाखरे यांच्यासोबत एक जटील अलंकृत पोशाख घातलेल्या मॉडेलने या शोची सुरुवात झाली. या शोचे खास आकर्षण म्हणजे दोन मॉडेल एका मोठ्या टीशर्ट एकत्र आल्या होत्या. टीशर्टवर फुलांचे प्रिंट केलेले होते.