आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Lakme Fashion Week Siddhartha Mallya Looking Sharp

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॅक्मे फॅशन वीकममध्ये रॅम्पवर दिसला सिद्धार्थ माल्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॅक्मे फॅशन वीकच्या दुस-या दिवशी तिस -या शोमध्ये सिद्धार्थ माल्याचा जलवा तेव्हा पाहण्यासारखा होता जेव्हा तो कोमल सुदने डिझाईन केलेल्या काळ्या चमकत्या टक्सीडो सूटमध्ये रॅम्पवर शो स्टॉपर बनून उतरला.
'द ट्वीलाईट सेडक्सन' नावाच्या कलेक्शनने शोमध्ये नवीन उत्साह भरला. जेव्हा कोमलने डिझाईन केलेल्या सेक्सी लाल बिकनी टॉप सोबत ब्लॅक लेगिंग्सवर पर्पल रंगाची साडी घालून एक मॉडेल रॅम्पवर अवतरली.
तर दुसरीकडे, डिझाईनर परनिया कुरेशी 'एन इविनिग इन पॅरीस'नावाचे कलेक्शन घेऊन रॅम्पवर आली. त्यांच्या या कलेक्शनमध्ये पॅरीस थाट स्पष्ट दिसत होता. मरून रंगाचे काठ असलेल्या ब्लॅक साडीसोबत मेंडेरियन कॉलर ब्लाउज घातलेली बॉलीवुड अभिनेत्री एमी जॅक्सनने आपला जलवा रॅम्पवर दाखवला. जेव्हा ती रॅम्पवर आली तेव्हा सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळून बसल्या होत्या.