आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

LFW : तीन डिझायनर्सने सादर केले त्यांच्या खास शैलीतील अप्रतिम कलेक्शन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॅक्मे फॅशन वीकच्या दुस-या दिवशी दुस-या शोमध्ये तीन प्रतिभाशाली डिझायनर्सच्या कलेक्शनचा दबदबा दिसला. सर्वात पहिल्यांदा निमिष शहा यांनी आपल्या बीट डिटेलिंग, साईज ब्लेंडिंगची झलक सादर केली. हे डिझाइन तयार करण्यासाठी ऑर्गेनिक कॉटन, खादी, वूल आणि सिल्क तसेच शिफॉनचा वापर केला गेला आहे. फेमिनिन मिडिज, जॅकेट, स्कर्ट्स, सूट्स हे त्यांचे कलेक्शन रिट्रो फॅशनने प्रेरित आहेत.
पायल खंडवाल यांनी लेयर्ड लायनिंग असलेले कलेक्शन सादर केले. अध्यात्मिक स्वरूपाचे कलेक्शन त्यांनी सादर केले. कलेक्शन सादर करण्यासाठी त्यांनी विविध रंगांचा वापर केला. यामध्ये नारंगी, लाल, कॉफी, निळा असे अनेक रंग वापरण्यात आले होते. मॅचींग कॉलर आणि बेल्ट, समुराय स्कर्ट, असे विविध प्रकारचे कलेक्शन सादर केले.
तिस-या लाईनमध्ये रोमा नरसिंघांनी यांनी 'ड्रीम कॅचर' कलेक्शन सादर केले. जे एका कवितेवर प्रभावित होऊन तयार केलेले कलेक्शन आहे.
छायाचित्रात पाहा मॉडेल्स आणि त्यांचे सुंदर ड्रेसेस...