आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॅक्मे फॅशन वीकमध्ये झळकले भारताचे रंग

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

३ ऑगस्टपासून रंगारंग लॅक्मे फॅशन वीकला सुरुवात झाली आहे. या शोमध्ये फॅशन इंडस्ट्रीतील एकापेक्षा एक फॅशन डिझायनर्स सहभागी झाले आहेत. दिव्य मराठी डॉट कॉम तुम्हाला पायल सिंघलच्या शोची एक खास झलक दाखवत आहे.
प्रसिद्ध डिझायनर पायल सिंघलच्या या शोमध्ये भारताचे रुप झळकले. या शोमध्ये भारतीय सौंदर्य पाहायला मिळाले. रॅम्पवर राजस्थानची परंपरा झळकली आणि गुलाबी रंगाने सगळ्यांचे मन मोहून घेतले.
या शोमध्ये उत्तर भारतातील काळानुरुप बदलेल्या फॅशनचीही झलक दिसली. येथे भारतीय आदिवासींच्या वेशभूषेबरोबरच कच्छ आणि गुजरातचे रंग दिसले.
या रंगीबिरंगी वेशभूषेद्वारे एकप्रकारे भारताच्या संस्कृतीला सलमा करण्यात आले. शोमध्ये एकीकडे मॉडेल्स कन्टेम्परेरी लूकचे कुर्ते, कप्तान, ट्युनिक, काळी साडी आणि शॉर्ट लहंगामध्ये दिसल्या तर दुसरीकडे अर्बन लूकमध्ये एम्ब्रॉइडरी आणि जरदोसी वर्कही दिसले.
पायल सिंघलच्या या शोची शो-स्टॉपर शिबानी डांडेकर आणि पुनीता पाठा होते. लॅक्मे फॅशन वीक विंटर फेस्टिव्हलची प्रत्येक बातमी जाणून घेण्यासाठी लॉग ऑन करा www.divyamarathi.com
लॅक्मे फॅशन शोमध्ये पोहचले डिझायनर्स
लॅक्मे फॅशन वीकच्या ओपनिंग पार्टीमध्ये पोहोचला सिद्धार्थ
PHOTOS : लॅक्मे फॅशन वीकची रंगारंग सुरूवात
'दिव्य मराठी' वेब साइटवर पहा लॅक्मे फॅशन वीकचे खास कव्हरेज....
'लॅक्मे फॅशन वीक'मध्ये नवोदित डिझायनर्सचा जलवा