आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
लॅक्मे फॅशन वीकचा दुसरा दिवस बघण्यासारखा होता. बबीता मल्कानीने तिचे खास कलेक्शन यावेळी सादर केले. रॅम्पवर मॉडेल्स जेव्हा अवतरल्या तेव्हा डिझाइन्सची खास झलक बघायला मिळाली. बबीताने तिच्या खास फ्रि स्टाईल ड्रेसेसचे कलेक्शन यातून दाखवले. तिच्या या शोमध्ये मॅक्सिस, थ्रोज, फ्यूजन आणि साड्यांचे कलेक्शन बघायला मिळाले. बबीताचे हे कलेक्शन अफ्रिकेच्या तांझानियाच्या बुशमॅन्सने इंस्पायर्ड होते.
चमकत्या रंगांचा वापर या ड्रेसेसमध्ये खास पध्दतीने करण्यात आला होता. मल्कानी यांच्या फोरल लुक कलेक्शनमध्ये हलक्या वजनाची जरी देखील दिसून आली. सादर करण्यात आलेल्या अन्य ड्रेसेसमध्ये जसे, ट्राउझर, स्कर्ट आणि शर्टस चमकत्या क्रिस्टल आणि फ्लोअर लुकमध्ये दाखवण्यात आले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.