आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • आज आपण असेच ‘मोडके’ शब्द पाहू या!

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाषेतली तोडफोड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंग्रजी भाषा तोडफोड करण्यात चांगली पटाईत आहे! मराठीत ज्याप्रमाणे तोडणे, फोडणे, कापणे, फाटणे, मोडणे, तडा जाणे अशा तुटण्याच्या अनेक छटा आहेत, अगदी तशाच इंग्रजीमध्येही आहेत. आज आपण असेच ‘मोडके’ शब्द पाहू या!
To break म्हणजे मोडणे किंवा तुटणे/तोडणे हे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे.
उदा. - “Please be careful with this table. I don’t want the glass to break,” Mr. Mehta instructed the movers and packers..
असे आणखी समानार्थी शब्द घेऊ.
To burst चा अर्थ आहे स्फोट होणे, फुटणे.
उदा. - As the big red balloon burst in the baby’s hands, he started crying.
असाही एक वाक्यप्रयोग आहे. जसे, Unable to bear the teasing by the boys, Revati burst into tears.

एखादी घटना अचानक किंवा नाट्यपूर्ण रीतीने घडली, तर burst चा असा वापर करता येतो : It is now more than 50 years that Amitabh Bacchhan burst onto the scene as the hero in ‘Janjeer’.

Crack म्हणजे तडा, भेग आणि to crack म्हणजे तडा जाणे. उदा. - One fine morning the hen’s egg cracked open and a tiny chick came out.

At the crack of dawn म्हणजे अगदी पहाटेची, उजाडायची वेळ अशा अर्थाचाही शब्दप्रयोग आहे.
My grandparents always wake up at the crack of dawn and start their daily chores.

To crumble म्हणजे तुकडे होणे, चुरा होऊन
जाणे. जसे,
- After the terrible earthquake, many houses crumbled to dust.

थोड्या वेगळ्या अर्थछटेचे हे शब्द पाहा...
To tear याचा अर्थ आहे फाटणे. तसेच to split म्हणजेही फाटणे किंवा दुभंगणे. मात्र, गंमत अशी आहे की हे दोन्ही सारख्या अर्थाचे शब्द वेगवेगळ्या संदर्भात वापरले जातात. त्यांची उदाहरणे पाहू.
- “Don’t tear your new uniform,” Rahul’s mother warned him.
- My boss tore my resignation letter to pieces..
- While coming back from the market, Sarala’s bag split open and all the things stuffed in it fell on the road.
- After the split with his girlfriend, Rounak shifted to Bengaluru.

याचप्रमाणे to smash म्हणजे फोडणे, फटका
मारणे तर to shatter चा अर्थ आहे फुटणे, तुकडे तुकडे होणे.
उदा. - The rioters barged into the Mayor’s office and smashed the furniture with sticks and stones.
- The sound of the explosion shattered the window glass.

Shatter हा शब्द याच अर्थाने, पण आपल्या मनाच्या भावनांशी संबंधितही वापरतात, जसे मनाला यातना होणे, दु:ख होणे वगैरे.
उदा. - Vaidehi was shattered when she heard the news about her family’s death in a car crash

आता शेवटी to snap हे क्रियापद बघा. याचा अर्थ ‘काडकन’ मोडणे. हा शब्द बहुतकरून लाकूड, पेन्सिल, हाड मोडणे इ.साठी वापरला जातो.
- As Raju tried to snatch the pencil from Meenal , it snapped into two
आता तुम्ही हे शब्द शोधा. - Crush, ruin