आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अष्टांगयाेग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
२१ जून हा दिवस जागतिक याेग दिवस म्हणून साजरा केला जाताे. जगभरात याेगाचे महत्त्व अाता लक्षात येत अाहे. याेगा हा प्रकार काेणत्याही धर्माला वा अध्यात्माला अनुसरुन नसून ताे अाराेग्य सुदृढ ठेवण्यासाठी व्यायामाचाच एक उत्तम प्रकार अाहे, हे अाता सर्वत्र अधाेरेखित हाेते अाहे. त्यामुळेच या दिवशी विविध उपक्रमांनी याेगा या प्रकाराला अापलंस करण्याचा प्रयत्न हाेताना दिसताे. उद्याच्या (दि. २१) याेग दिवसानिमित्त ‘दिव्य मराठी’च्या वाचकांसाठी याेगातीलच काही प्रकार, टिप्स, करिअर अाणि याेगा शिकविणाऱ्या संस्थांची माहिती देण्याचा हा प्रयत्न...

अष्टांगयाेग
सर्व स्तरातील लोकांना समाधान मिळवून देण्यात योग हे प्राचीन शास्त्र कालातीत ठरले आहे. ३५ वर्षांपूर्वी जेव्हा आर्ट ऑफ लिव्हिंग सुरू झाले, तेव्हा फक्त हिप्पी वगैरे लोकच योग साधना करीत असलेले दिसत असत. आज मात्र सर्व खंडामधील लाखो लोक योगसाधना करत आहेत. जगाच्या बदलता राहणीमानानुसार योगाने स्वत:ला चांगले जुळवून घेतले आहे. त्यामुळे योगाला स्वत:ची वैश्विक आणि निधर्मी अशी ओळख करून देण्यात आणि सर्वधर्मीय लोकांना ही साधना करण्यात सहजता येण्यात मदत झाली. जे देश अगदी पुराणमतवादी आहेत त्यांना सुद्धा.

योगाचे परिपूर्ण तत्त्वज्ञान त्याच्या अष्टांगावर आधारित आहे. दुर्दैवाने लोकांना वाटते की, त्या एकानंतर एक करण्याच्या आठ पायऱ्या आहेत. ही अष्टांगे क्रमश: येणारी नाहीत, तर ते संपूर्ण योगाचे वेगवेगळे भाग आहेत. अष्टांग हे खुर्चीच्या चार पायांसारखे आहेत. एक पाय जरी ओढला तरी संपूर्ण खुर्ची हालेल. आसने महत्त्वाची असली तरी प्राणायाम आणि ध्यानाशिवाय योग हा योग असू शकत नाही. ध्यानाची छोटीशी झलकही एखाद्याचे जीवन बदलू शकते. तुरुंगातील शिबिरांमध्ये हे होताना आम्ही बघितले आहे. कैद्यांना ध्यानाचा अनुभव मिळताच त्यांची विचार करण्याची आणि वागण्याची रीतच बदलून जाते. ध्यान (६ वे अंग) करण्याने जीवनात यम (१ले अंग) आणि नियम (२रे अंग) दिसून येऊ लागतात. योगामुळे मानसिक ताणाव, चिंता, व्यवसायामुळे येणारा थकवा, व्यसने आणि निद्रानाश अशा बऱ्याच व्याधींपासून अनेक लोकांना मुक्ती मिळाली आहे.

योग हे जगासाठी एक प्रभावी साधन आहे. योगाच्या परिपूर्णतेमुळे ते आणि शुद्ध स्वरूपामुळे आधुनिक जीवनातील सर्व व्याधींच्या मुळाशी पोहोचू शकते. आजची सर्वात मोठी व्याधी म्हणजे मानसिक ताण. मानसिक ताण म्हणजे खूप करायचे आहे आणि त्यासाठी वेळ आणि शक्ती नाहिये. कामाचा व्याप कमी करणे आणि जास्तीचा वेळ अजिबात शक्य नाही, त्यामुळे आपल्याकडे एकच पर्याय आहे आणि तो
म्हणजे आपल्यातील शक्ती, ऊर्जा वाढवणे. योगामुळे कमीत कमी वेळात जास्तीत जास्त शक्ती, ऊर्जा निर्माण होते. काही मिनिटांच्या ध्यानामुळे आठ तासांच्या झोपेइतकी विश्रांती मिळते. योगामुळे जी गहिरी विश्रांती मिळते, त्यामुळे माणूस त्याच्या कामात जास्त जोमदार, सजगतेत तीक्ष्ण आणि निर्णय घेण्यात जास्त अंतर्ज्ञानी बनतो. त्यामुळे मग माणूस त्याच्या छोट्या-छोट्या समस्यांमुळे खचून जात नाही उलट इतरांसाठी त्याहून मोठ्या समस्यांचा सामना करायला त्या सोडवायला तयार होतो.

योग ही केवळ एक साधना नाही, तर चेतनेची एक अवस्था आहे; जी साधारण अवस्थेच्या पलीकडची आहे. आधुनिक जगासाठी योग हा स्वत:च्या क्षमता ओळखून त्यांचा विकास करण्याचा मार्ग आहे.

पुढे वाचा, नृत्ययोगाविषयी...
बातम्या आणखी आहेत...