Home | Magazine | Divya Education | 74 Lakh Expert Necessary In Health Service

वैद्यकीय शिक्षण घेणा-यांसाठी खुष खबर, आरोग्य सेवेत ७४ लाख तज्ज्ञांची निकड

दिव्य मराठी | Update - Aug 24, 2015, 07:03 AM IST

एनएसडीसीनुसार २०२२पर्यंत भारतीय आरोग्य सेवेच्या क्षेत्रात ७४ लाख तज्ज्ञांची निकड भासेल.

 • 74 Lakh Expert Necessary In Health Service
  एनएसडीसीनुसार २०२२पर्यंत भारतीय आरोग्य सेवेच्या क्षेत्रात ७४ लाख तज्ज्ञांची निकड भासेल. पदवीधरांपासून एमबीबीएस, बीफार्म व स्पेशलाइज्ड डिग्री मिळवणाऱ्यांना विपुल संधी आहेत.
  हे ल्थकेअर म्हणजेच आरोग्य सेवेचे क्षेत्र भारतातील सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र आहे. केवळ उत्पन्नाचा भरभक्कम स्रोत म्हणूनच नव्हे, तर रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यामुळे हे क्षेत्र महत्त्वाचे आहे, परंतु या क्षेत्रात उच्चशिक्षितांसह तज्ज्ञांची वानवा आहे. आरोग्य सेवांसह पूरक क्षेत्रांतील म्हणजेच नर्सिंग असोसिएट्स, मेडिकल असिस्टंट्स, मेडिकल इक्विपमेंट ऑपरेटर्स, फिजियोथेरपिस्ट, डाएटिशियन व डेंटल असिस्टंट्स अशा ११ लाख तज्ज्ञांचीही निकड भासत आहे. याच कारणामुळे या सेक्टरमध्ये तज्ज्ञांना प्रचंड मागणी आहे. या सेक्टरमधील संधी जाणून घेण्यासाठी या क्षेत्रातील गरजांवर दृष्टिक्षेप टाकूया.

  रुग्णालये
  देशात २०,००० शासकीय रुग्णालय आहेत. याशिवाय खासगी रुग्णालयातील ५४०० कोटी डॉलरच्या उलाढालीमुळे या क्षेत्राचे महत्त्व वाढत आहे. असे असूनही या क्षेत्राची जाण असणारे तज्ज्ञ उपलब्ध नसणे हीच मोठी समस्या आहे. भारतात दर १७०० नागरिकांमागे एक डॉक्टर आहे. मात्र, डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार हे प्रमाण १:१००० असे असायला हवे. एका सर्वेक्षणानुसार भारतात ३० लाख डॉक्टर्स आणि ६० लाख नर्ससेसची गरज आहे. याशिवाय २०१२ मधील एका अहवालानुसार देशात आरोग्य सेवेशी पूरक क्षेत्रातील ६४ लाख अलाइड हेल्थकेअर प्रोफेशनल्सची आवश्यकता आहे. विद्यमान परिस्थिती आणि या क्षेत्रातील संधी पाहता क्वालिफाइड फिजिशियन, नर्स, पॅरामेडिक्स स्टाफसाठी येणारा काळ अतिशय चांगला ठरणार आहे, हे निश्चित.

  औषधनिर्माणशास्त्र
  २५,००० मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स, संशोधनावर होणार प्रचंड खर्च व प्रॉडक्ट पेटंट्समुळे भारत जेनेरिक औषधांचे उत्पादन करणारा प्रमुख दश बनला आहे. फार्मास्युटिकल्स मार्केटमध्ये गुजरात अग्रेसर असून या राज्यातील व्यवसायवृद्धीची टक्केवारी २२.४ आहे. १२,६०० कोटींची उलाढाल असणारे बायोफार्मा हे क्षेत्र एकूण महसुलात सर्वाधिक वाटा उचलणारा मोठे आणि महत्त्वाचे क्षेत्र आहे. फार्मसी ग्रॅज्युएट्ससह प्रॉडक्शन, क्वालिटी कंट्रोल व मार्केटिंग डिग्री मिळवणाऱ्यांसाठी संधीचे दालन खुले आहे.

  उपकरणनिर्मिती
  तुलनेत ही इंडस्ट्री लहान आहे; परंतु प्रोजेक्ट मॅनेजमेंट, प्रॉडक्ट डेव्हलपमेंट आणि सोर्सिंग अशी पार्श्वभूमी असणाऱ्यांसाठी हे क्षेत्र महत्त्वाचे ठरणार आहे. यात तांत्रिक ज्ञानासह अभियांत्रिकी क्षेत्रातील युवकांनाही संधी आहेत. इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल व केमिकल इंजिनिअरिंग आणि पीएचडी करणाऱ्यांना सर्वाधिक मागणी असेल.

  आरोग्य विमा
  १२,६०६ कोटींचे आरोग्य विमा क्षेत्र आताच एकंदर विमा क्षेत्राच्या एकचतुर्थांश भाग बनले आहे. या क्षेत्रात रिलेशनशिप मॅनेजरपासून मेडिकल ऑफिसर, मेडिकल ऑफिस असोसिएट, इन्श्युरन्स अॅडव्हायजर अशा अनेक पदांसाठी मागणी आहे.

  लक्षणांवरून निदान
  पॅथॉलॉजी आणि इमेजिंग सेंटर्ससह विद्यमान डायग्नोस्टिक इंडस्ट्रीतील उलाढाल ८०० कोटी डॉलरची आहे. देशात एक लाख लॅबोरेटरीज आहेत. यातील ७० टक्के हिस्सा पॅथॉलॉजी व ३६ टक्के रेडिओलॉजी व इमेजिंग सर्व्हिसेसचा आहे. विशेष म्हणजे मोठ्या प्रयोगशाळांमध्ये दररोज दोन ते तील हजार चाचण्या होतात. ही आकडेवारी पाहता बायोकेमिस्ट्री, हिमेटोलॉजी, इम्युनोलॉजी व मायक्रोबायोलॉजी या विषयांचे ज्ञान असणाऱ्या तज्ज्ञांना मागणी वाढेल.
  नोकरीच्या संधी : पॅथॉलॉजिस्ट, कंसल्टंट्स, असिस्टंट प्रोफेसर्ससारख्या मोठ्या पदांशिवाय लॅब टेक्नोलॉजीच्या क्षेत्रात नोकरीच्या अनेक संधी आहेत. फॉरेन्सिक पॅथॉलॉजीसारखे क्षेत्रही आव्हानात्मक आहे. काही वर्षांत रिसर्च मॅनेजमेंटचे क्षेत्रही आकर्षक बनणार आहे.

  आरोग्य सेवेतील संधी
  २०० कोटी डॉलरची होम हेल्थकेअर
  इंडस्ट्री, मेडिकल केअरमध्ये सुसंधीचे दालन खुले
  २२ टक्क्यांपर्यंत
  वाढणार हेल्थकेअर मॅनेजमेंटमधील संधी पाच वर्षांत
  २१,५०,०००
  प्रोफेशनल्सची निकड भासेल
  २०२० पर्यंत फार्मा सेक्टरमध्ये
  ३६,००० कोटींची
  असेल २०१८ पर्यंत भारतीय
  मेडिकल टुरिझम इंडस्ट्री, हजारो नोकऱ्या उपलब्ध होणार
  पुढे वाचा... अशी फुलली आरोग्य सेवेची बाजारपेठ

 • 74 Lakh Expert Necessary In Health Service

Trending