आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरळीत मासिक पाळीसाठी योगासनं

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयुर्वेदानं मासिक पाळीच्या काळात काही विशिष्ट योगासनांबद्दल मार्गदर्शन केलं आहे. त्यांच्या साह्यानं त्या चार दिवसांतला शारीरिक, मानसिक त्रास कमी करता येऊ शकतो. 


मुलींना मासिक पाळी सुरू होऊन रजोनिवृत्ती म्हणजे पाळी बंद होणे ही क्रिया साधारणपणे वयाच्या १२-१३व्या वर्षापासून पन्नाशीपर्यंत होते. पाळीच्या वेळी ३ ते ७ दिवस योनीमार्गातून रक्तस्राव होणे/अंगावर जाणे नैसर्गिक असते. वैज्ञानिकदृष्ट्या दर महिन्याला एक स्त्रीबीज बीजांडातून पक्व होऊन बाहेर पडते. त्याच्या वाढीसाठी गर्भाशयात एक आच्छादनही तयार होते. योग्य वयात विवाह केल्यानंतर पुरुषाच्या वीर्यातील पुरुषबीज व स्त्रीच्या गर्भाशयातील स्त्रीबीज यांचा संयोग होऊन गर्भ तयार होतो. पण ज्या वेळी स्त्रीबीज फलित होत नाही त्या वेळेस फलित न झालेल्या बीजासहित आच्छादन बाहेर टाकले जाते. ते रक्ताच्या स्वरूपात योनीमार्गाद्वारे बाहेर टाकले जाते म्हणून हा रक्तस्राव होतो.


संप्रेरकांमध्ये बदल होतात, शारीरिक बदल जाणवतो तसेच ओटीपोटात वेदना होणे, कंबर दुखणे, पाय दुखणे, अस्वस्थपणा इत्यादी लक्षणे दिसतात. मासिक पाळीच्या काळात स्त्री संपूर्णपणे आत्मकेंद्रित असते. या कालावधीला एक संधी समजून स्त्री स्वतःच्या शारीरिक व मानसिक घडामोडींबद्दल विचार करू शकते तसेच वैचारिक जागरूकता वाढवू शकते. वाचन, संगीत एेकणे, शरीर स्वच्छता, पौष्टिक आहार, आयुष्यातील ध्येयधोरणांची सकारात्मक व तौलनिक दृष्टिकोनातून मांडणी करणे, वैयक्तिक दैनंदिनी ठेवणे, तसेच सौम्य स्वरूपाची काही विशिष्ट योगासनं केल्यास शारीरिक वेदना, मानसिक ताण व अस्वस्थपणा कमी होऊन आत्मविश्वास वाढतो. मासिक पाळी सुरळीत राहते.

 

सुप्त –बद्धकोनासन 
डोक्याखाली लोड घेऊन आणि त्याच वेळी कमरेच्या खाली उशीचा आधार घेऊन दोन्ही पायांची स्थिती बद्धकोनासनात बांधा. अपचन, पोट गुबारणे, गॅसेस होणे, ओटीपोटात कळा येणे यावर हे आसन गुणकारी आहे.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, सुरळीत मासिक पाळीसाठी योगासनं ​...

 

- डॉ. नयना शिऊरकर (पाठक), औरंगाबाद
nmshioorkar@gmail.com

बातम्या आणखी आहेत...