आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हे बुद्धा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उद्या (सोमवार ३० एप्रिल २०१८) बुद्धपौर्णिमा. मानवी प्रज्ञा, शील आणि करुणेच्या  शांत-शितल प्रकाशाचे मागणे मागणाऱ्या गौतम बुद्धाच्या शिकवणीचे जाणीवपूर्वक स्मरण करण्याचा हा दिवस. शब्द असो, चित्र असो वा शिल्प, बघणाऱ्याला सत्याच्या नजीक घेऊन जाणारा बुद्ध दरवेळी नव्याने उमजतो. जेव्हा तो उमगतो, माणसाने माणूस होण्याच्या दिशेचे ते एक पाऊल असते...

 

गौतम नावाचा तू
आमच्यासारखाच हाडामांसाचा माणूस होता
सिद्धार्थ नावाचा,  ह्या मातीवरील तू
पहिला सर्वज्ञ ज्ञानी महापुरुष
ह्या मातीवरील तू
पहिला डोळस मानसशास्त्रज्ञ
शरीर अन् शरीरातील मन सुंदर निकोप करणारा.
चांगला माणूस होण्यासाठी शस्त्राऐवजी हाती
कमळ फुलं देणारा तू
राजवंशी राजहंस द्रष्टा, युगपुरुष

 

विश्वातील ब्रह्मांडापलीकडे तुझी
पोहोचलेली वाऱ्यासारखी शुद्ध नजर
निसर्ग समजावून सांगणारा तू
पहिला संशोधक.
ह्या मातीवरील सर्व सजिवांना मैत्रपूर्ण
जगण्याचा हक्क सांगणारा तू
पहिला निसर्ग महापूत्र
बुद्ध.
 
भयमूक्त माणूस व्हावा, ही तुझ्या धम्माची शिकवण
आणि थोतांड, भंपकपणा, अंधश्रद्धा, कर्मकांड हे सर्व
लाथाडणारा जगातील तू पहिला समाजसुधारक
महामानव-
चराचरात मैत्रीची पेरणी करणारा तू
पहिला प्रज्ञावंत, शीलवंत, करुणावंत
बुद्ध.

 

- श्रीधर अंभोरे
लेखकाचा संपर्क : ९८९०९६५८५०

बातम्या आणखी आहेत...