आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुगल प्‍लस: एक दुर्लक्ष्‍िात माध्‍यम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुगल म्हटले की, आपल्याला जीमेल आणि गुगल सर्च इंजिन या गोष्टी माहीत असतात. अँड्राॅइड वापरकर्ते आहेत त्यांना गुगल फोटो वा गुगल ड्राइव्हचा पर्यायसुद्धा ओळखीचा असतो. पण गुगलचे गुगल प्लस हे अॅप विविध प्रकारे मार्केटिंग आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वापरता येते, हा विचार चटकन होत नाही. Google+ वापर एक सोशल नेटवर्किंग साइट म्हणून करणं फायद्याचंच आहे.


फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम यांसारखे अनेक पर्याय मार्केटिंगकरिता उपलब्ध आहेत, त्या मानाने गुगल प्लस मागे पडल्यासारखे वाटते परंतु वस्तुस्थिती वेगळीच आहे. सर्च इंजिन हा सर्वात मोठा भक्कम पाया गुगलकडे आहे. त्यामुळे तुम्ही जे गुगल प्लसवर पोस्ट करता ते सतत आणि नियमितपणे गुगल शोधात येणार आहे हे वेगळे सांगायला नको. 


कुठलीही गोष्ट शोधायचा प्रयत्न केला तर गुगल याच सर्च इंजिनचा जास्तीत जास्त वापर केला जातो, ते वापरणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे हे ध्यानात असणे गरजेचे आहे. 


वेबसाइट, ब्लॉगचा वापर जे व्यावसायिक / व्यक्तिगत पातळीवर करत आहेत त्यांना गुगलचे फायदे माहीत आहेत. ब्लॉगवरची माहिती जशी गुगल शोधात येते तसेच गुगल प्लसचे आहे. तुम्ही लेखक असाल तर तुमची आर्टिकल्स गुगल प्लसवर पण पोस्ट करा. तुमच्या लक्षात येईल की, कुणीही ती वाचायचा प्रयत्न केला नाही तरीसुद्धा गुगल तुमच्या पोस्ट शोधामध्ये अग्रक्रमाने देते.


व्यक्तिगत वापर : गुगल प्लसचा वापर शिकण्यासाठी नेहमीच करता येतो. गुगल प्लसची मांडणी वा आराखडा बघितला तर त्याचे प्रमुख घटक असतात - प्रोफाइल, शोध, कम्युनिटीज, सर्कल्स आणि नोटिफिकेशन्स. 


आपले प्रोफाइल तयार करताना जास्तीत जास्त आणि अद्ययावत माहिती भरावी. आकर्षक फोटो आणि कव्हर फोटो असावा. हे सर्व नियम इतर सोशल मीडियासारखेच आहेत. गुगल प्लसचा गाभा त्याच्या कम्युनिटीज आणि सर्कल्स यांमध्ये आहे. इतर माध्यमात जसे ग्रुप्स असतात तशा या कम्युनिटीज आहेत. शास्त्रीय संगीत आवडत असेल तर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताला वाहिलेल्या कम्युनिटीचे तुम्ही सदस्य झाले पाहिजे. अशा अनेक कम्युनिटीचे अपडेट्स तुम्हाला इथे मिळवता येतात. प्रत्येक ठिकाणी शास्त्रीय संगीताविषयी विविध विषयांवरची देवाणघेवाण होते हे तुमच्या लक्षात येईल. त्यातले विविध सदस्य कोण आहेत ते शोधून त्यांच्याशी संपर्क करण्याची संधी तुम्हाला मिळते. हेच शास्त्र, खेळ वा इतर कोणत्याही क्षेत्राला लागू आहे. अशा कम्युनिटीज हे शिक्षणाचे मोठे माध्यम आहे. त्याशिवाय तुम्ही एखादी नोकरी शोधत असलात तर योग्य कंपनी वा नोकरीचे असे अनेक पर्याय तुम्हाला प्राप्त होतात. 


गुगलची सर्कल्स ही वर्गीकरण व्यवस्था आहे. त्याचा प्रमुख वापर तुम्ही ज्यांच्या संपर्कात आहेत त्या मित्रांचे वर्गीकरण करण्यासाठी होतो. असे केल्यामुळे यादीमध्ये शोध घेणे सोपे जाते. व्यक्तिगत वापर करताना सर्व माहिती भरावी आणि या फीचरचा फायदा घ्यावा. 


व्यावसायिक वापर : एक सोशल मीडिया मॅनेजर म्हणून वा एक व्यावसायिक म्हणून तुम्ही गुगल प्लस वापरत असाल तर आपल्या व्यवसायाचे गुगल प्लस बिझनेस पेज करणे आवश्यक आहे. तिथे सर्व माहिती अद्ययावत असेल अशी दक्षता घ्यावी. फोटो व कव्हरकडे विशेष लक्ष द्यावे. आपल्या प्रोफाइलवर बहुतांश सेटिंग पब्लिक असावे. माहिती सर्वांना खुली असावी. 


तुम्ही facebook मार्केटिंगसाठी वापरत असलात, मार्केटिंग मटेरियल तयार केलेले असेल तर ते तुमच्या गुगल प्लसवर वारंवार पोस्ट करून पाहावे. अनेकदा सोशल मीडियामध्ये पोस्ट केले तरी ते गुगल सर्चद्वारे लोकांपर्यंत जाते असे आढळते. असे सर्व लेखन वा मार्केटिंग मटेरियल तुम्ही इतर माध्यमांकरिता तयार केले असले तरी ते तुम्ही गुगल प्लसवर पोस्ट करू शकता. 


इथे व्हिडिओ पोस्ट करता येतात, लेखन पोस्ट करता येते, फोटो वा आकृत्या पोस्ट करता येतात. मूळ लेखनात अगदी थोडासा बदल केला तर एकच लेखन वेगवेगळ्या माध्यमांत वापरता येते हे तुम्हाला माहीत आहेच. अशा प्रकारे वेगळा वेळ न दवडता तुम्ही गुगल प्लसवर पोस्ट करू शकता. 


तुमचा व्यवसाय जर ऑनलाइन/ ई-कॉमर्स पद्धतीचा आहे, कपडे, दागिने वा पुस्तकांची ऑनलाइन विक्री करत असलात तरी जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत जाण्याकरिता आणि विक्रीकरिता गुगल प्लस वापरणे फायद्याचे आहे. तुमचे व्यवसाय असतील तर गुगलवर आपल्या व्यवसायाची नोंद असणे फायद्याचे आहे हे तुम्हाला माहीत आहेच. तसेच गुगल प्लस वापरणेसुद्धा फायद्याचे आहे. व्यावसायिक दृष्टिकोनातून असा वापर तर करायलाच हवा. गुगल प्लसच्या सर्व घटकांचा वापर करावा. तिथल्या कम्युनिटीमध्ये भाग घ्यावा, आपले प्रोफाइल अद्ययावत ठेवावे. विविध सर्कल्स तयार करावी. व्यवसायाचे बिझनेस गुगल प्लस पेज आणि कम्युनिटीचे फीचर व्यावसायिकांना भागीदार, ग्राहक आणि कर्मचारी मिळवण्याकरिता वापरता येते हे नेहमी ध्यानात असू द्यावे. 


महत्त्वाच्या बाबी : आपले गुगल प्लस प्रोफाइल सर्व प्रकारे अद्ययावत असावे. गुगल प्लसवर तुम्ही व्यावसायिक नसलात तरी वेगळ्या कम्युनिटी आणि कलेक्शन करू शकता. लोकप्रिय अशा गुगल प्लस प्रोफाइल बघितल्या तर त्यांनी वेगवेगळी कलेक्शन्स  केली आहेत असे तुमच्या लक्षात येईल. 


तुम्ही ज्यांच्याशी देवाणघेवाण करता त्या सगळ्या मंडळींचे कुठल्या पद्धतीचे काँटॅक्ट आहेत ते वर्गीकरण करण्याची सोय गुगलने दिली आहे. या सोयीला गुगल सर्कल्स म्हणतात. त्यामुळे तुमच्याशी वारंवार संपर्क करणारी, तुमच्या पोस्ट कमी-अधिक वाचणारी मंडळी असे विविध वर्गीकरण करता येते. या गुगल सर्कल्स आणि कम्युनिटीचा अतिशय योग्य पद्धतीने जर वापर केला तर त्यातून खूप शिकता येते. व्यवसाय वा नोकरीच्या दृष्टीने खूपच फायदा होऊ शकतो. तुमची सर्कल्स पब्लिक ठेवायची की, इतरांपासून लपवून ठेवायची हे तुम्हाला ठरवता येते. तुमचा दृष्टिकोन अधिकाधिक लोकांपर्यंत जायला हवा असेल तर तुमच्या पोस्ट वा सर्कल्स यांना राहत्या जागेचे वा भाषेचे बंधन घालू नका. तुमचे गुगल प्लस प्रोफाइल सगळ्यांकरिता खुले ठेवा.
स्प्राउट सोशलसारखे एखादे अॅप वा प्रोग्रॅम विविध गुगल पेजेस आणि गुगल प्लस अकाउंट्सची मॅनेजमेंट करण्याकरता खूप उपयुक्त आहे.


- सोनाली जोशी, ह्युस्टन, अमेरिका
sonali.manasi@gmail.com

बातम्या आणखी आहेत...