आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफ्रिकेत भारतीय नृत्‍याचा प्रसार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परदेशात भारतीय शास्त्रीय नृत्य व लाेकसंस्कृतीचा प्रचार प्रसार व्हावा अाणि अापली संस्कृती टिकून राहावी या उद्देशाने नूपुर चांदाेरकर-खटावकर ही मराठी तरुणी दाेन वर्षांपासून मलावी या देशातील लिलाँग्वे या शहरात काम करतेय. अभिजात कला, कथ्थक नृत्य अाणि भारतीय शैलीतील लाेकनृत्याचे धडे मूळ जळगावची असलेली नूपुर स्थानिकांना देत अाहे. 


मूळ अाफ्रिकन लाेकांची तिथे वस्ती अाहे. रिदम वा ताल हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. लाकूड, घरगुती ड्रम यांसारख्या गाेष्टींपासून अनेक वाद्य त्या ठिकाणी बनतात व तेथे ती अतिशय लाेकप्रिय अाहेत. या वाद्यांच्या तालावर पारंपरिक नृत्य करणाऱ्या या अाफ्रिकन मंडळींना भारतीय कलेचीही आवड आहे. त्यामुळे नूपुरकडे अनेक जण नृत्य शिकायला येतात. भारतीय नृत्यशैलीत विविधता असल्याने लाेकनृत्यांचेही वेगवेगळे प्रकार आहेत. त्यांची वेशभूषा, त्यांचा शृंगार, गाणी, लय, ताल हे सगळंच वेगळं असल्याने तेथील लाेकांना अापलं संगीत अाकर्षित करतं. याचा परिणाम नूपुरला दिसून अाला. अाज २५ तरुण मुलंमुली तिच्याकडे शिकायला येतात. तेथील इंडियन कंट्री क्लबच्या सांस्कृतिक विभागाची ती प्रमुख असून या वर्षी प्रत्येक मराठी सणही तिने तिकडे साजरे केले. गणपतीच्या उत्सवात तेथील भारतीय कुटुंबातील जाेडप्यांचं लेझीम पथक बसवून धमाल उडवली. स्थानिक अाफ्रिकन नागरिक तसेच चीनमधील एक मुलगीही तिच्याकडे कथ्थक अाणि भारतीय लाेकनृत्य शिकायला येते. 


नूपुर कथ्थकमध्ये विशारद असून तिचं एमए झालं अाहे. ती जळगावातील नृत्य गुरु अपर्णा भट कासार अाणि प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना शमा भाटे यांची शिष्या अाहे. अापल्याला येणारी कला अाणि अापली अावड दाेन्ही जाेपासायला हवी यासाठी मलावीत गेल्यानंतर तिने नृत्याचे धडे देण्याचं ठरवलं. लग्नानंतर दाेन वर्षातच तिने अापले नृत्यकलेचे करिअर तिथे सुरू केले. सुरुवातीला अाव्हाने अालीच. अापली कला तिथल्या लाेकांपर्यंत पाेहचवणे अाणि खासकरून पारंपरिक गाण्यांचे शब्द आणि त्यांचे अर्थ समजावून सांगणं कठीण जायचं. परंतु अाता मात्र सवय झाल्याचे ती सांगते. तसेच तेथील लाेकांना अापल्या कलेची खूप अावड असून त्यांच्यातील शिकण्याची जिद्दही खूप अाहे. कलेलाही शिक्षणाप्रमाणेच प्राधान्य दिले जाते व तेवढे पालकही लक्ष देतात. त्यांच्यात सातत्य असून अत्यंत अावडीने ते लाेक शिकत असल्याचे नूपुरने सांगितले.


- यामिनी कुलकर्णी, जळगाव
yamini.kulkarni@dbcorp.in

बातम्या आणखी आहेत...