आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरूषही जबाबदारी घेतात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

घर सांभाळताना स्त्रियांची जेवढी धावपळ होते, तेवढीच पुरुषांचीही होते. जाॅब करणाऱ्या, करिअर करणाऱ्या स्त्रिया असतील तर पुरुषांची धावपळ होतेच होते. याचा अनुभव मला आहे. मी स्वयंपाक करत असले तर मुलांच्या गणवेशाला इस्त्री करणे, मुलांचे आवरणे हे काम यजमान करत. सुटीत गावी गेले तर परतण्याच्या वेळेपर्यंत घर स्वच्छ आवरलेले, ओटा चकाचक, दूध, ब्रेड, अंडी आणून ठेवलेले असतेच. ही तयारी पाहून दिल खुश हाेते. सेवानिवृत्तीनंतरही आम्ही घरातली कामे जबाबदारीने वाटूनच करतो. माझी मुलगी डाॅक्टर आहे, नवराही डाॅक्टर आहे. ते दोघेही मुलांना सांभाळण्यापासून भाजी करण्यापर्यंत सर्व कामे वाटून घेतात. तिचा मोठा मुलगाही आठ वर्षांचाच असूनही तिला मदत करतो. शाळेतील मैत्रिणींचे नवरे बायकोला शाळेत सोडणे, घ्यायला येणे, ही जबाबदारी घेतात. एकीचा नवरा डाळिंब सोलून, फळांच्या फोडी करून डब्यात आठवणीने देतो. माझे धाकटे दीर चटण्या उत्तम करतात. स्त्रियांनी फक्त हे लक्षात ठेवायला हवं की, पुरुष हौसेने घरकामात मदतीला येत असतील तर ‘ठेवा ते आधी, तुम्हाला नाही जमणार, उगीच लुडबुड नको,’ असं बोलून त्यांना नाउमेद करू नये.

 

ratithorat@gmail.com

बातम्या आणखी आहेत...