आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खेळता खेळता शिका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

Marathi kids Appमध्ये वर्णमालाविषयक माहिती पाहिली, आज त्यात आणखी काय शिकता येईल ते पाहू. मराठी बाराखडी – यात मराठी बाराखडी दिलेली आहे. प्रत्येक बाराखडीचा उत्तम प्रकारे उच्चार दिलेला आहे. सरावासाठी खालील बाजूस क्लिप दिली आहे. यामुळे लवकरात लवकर मुले शिकतात.


अंक ओळख – यामध्ये अंकाची ओळख सांगितली आहे. अंकाशी संबधित चित्र येते. याचबरोबर स्वर उच्चार ऐकण्यास मिळतो. १ ते २० अंक ओळख असून वरच्या बाजूला १ - १०० अंक व अक्षरात लेखन आहे.


मराठी महिने - यामध्ये मराठी महिन्याविषयी माहिती दिलेली आहे. संबंधित चित्र येते. याचबरोबर त्याविषयी उच्चार ऐकण्यास मिळतो. 
इंग्रजी महिने – यामध्ये इंग्रजी महिन्याविषयी माहिती दिलेली आहे. संबंधित चित्र येते. याचबरोबर त्याविषयी उच्चार ऐकण्यास मिळतो आणि किती दिवसाचा इंग्रजी महिना हे समजते.


आठवड्याचे वार दिलेले आहेत.
आकार, फळे, भाज्या, फुले, वाहने यांची माहिती असून संबधित चित्र येते. याचबरोबर त्याविषयी उच्चार ऐकण्यास मिळतो.
तसेच, पक्षी, प्राणी, रंग, ऋतू, यांचीही माहिती देणारे विभाग आहेत.
संगणकाविषयी माहिती दिलेली आहे. प्रत्येक भागाचे चित्र आवाजानुसार आहे. विविध व्यवसाय नोकऱ्यांविषयी माहिती दिलेली आहे. शालेय साहित्य, शारीरिक अवयव, माझे कुटुंब, चांगल्या सवयी, दिशांबद्दल माहिती आहे.


यामध्ये खूप छान खेळही आहेत.
बौद्धिक खेळ –यामध्ये बुद्धीला चालना देणारे खेळ आहेत.
अक्षरे ओळखा –यात अक्षरे ओळण्याचा खेळ आहे.
अंक ओळखा –यात अंकांची ओळख होणारे खेळ दिलेले आहेत .
प्राणी ओळखा –यात प्राण्यांची ओळख होणारे खेळ आहेत.


या अॅपमध्येच Alphabet puzzles flsh हा खेळ आहे. यामध्ये alphabetबद्दल खेळ दिलेले आहेत. playवर क्लिक करा. यानंतर puzzles आणि alphabet card यात puzzles यावर क्लिक केल्यास चित्र जोडणी करण्यास मुलांना आवडते. तसेच alphabet चा सरावही करता येतो. प्रत्येक puzzle सोडवताना आवाज दिलेला आहे.


- मंजूषा स्वामी, उस्मानाबाद
manjushaswami1975@gmail.com

बातम्या आणखी आहेत...