Home | Magazine | Madhurima | Mrinmayee Ranade writes about World Environment Day

थेंब थेंब

मृण्मयी रानडे, मुंबई | Update - Jun 05, 2018, 12:53 AM IST

पाऊस कधी एकदा येतोय असं झालंय सध्या सगळीकडेच. विदर्भ, मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्रात उन्हाचा वणवा तर मुंबई आणि को

  • Mrinmayee Ranade writes about World Environment Day

    पाऊस कधी एकदा येतोय असं झालंय सध्या सगळीकडेच. विदर्भ, मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्रात उन्हाचा वणवा तर मुंबई आणि कोकणात घामाच्या धारा. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासूनच पावसाचे वेध लागले आहेत, त्यात हवामान खात्याने पावसाच्या आगमनाच्या तारखा जाहीर करून पाऊस वेळेवर महाराष्ट्रात पोचणार असं सांगितल्याने जरा दिलासा मिळालाय. गेल्या काही वर्षांपासून ऋतूंमधले बदल आपण सगळेच अनुभवतोय. उन्हाळा अधिक तीव्र झालाय, थंडी कमी झालीय, पावसाचं प्रमाण कमीजास्त झालंय इतकंच नव्हे तर तो कधीही आणि कितीही पडतोय.


    आपण माणसंच या ऋतूंमधील बदलांना कारणीभूत आहोत, यात शंका नाही. बेफाम वृक्षतोड, पाण्याचा गैरवापर, डोंगर खोदून इमारतींचं बांधकाम, नद्यांमधलं प्रदूषण, वातावरणातली उष्णता वाढेल अशा काचांचा इमारतींच्या बाह्य आवरणातला वाढता उपयोग, छोट्या छोट्या अंतरावरही इंधन जाळून वाहनाने प्रवास, ही आणि अशी कितीतरी कारणं. नद्या, वृक्ष, पशुपक्षी, अग्नी, वायू, जमीन अशा सर्व नैसर्गिक घटकांना दैवत मानणारी आपली संस्कृती असली तरी पर्यावरण हा विषय आपल्याला नीटसा उमगलेलाच नाही की काय, असं वाटावं. नदीची पूजा करून तिच्यातच आंघोळ करायची, कपडे धुवायचे, सांडपाणी सोडायचं, निर्माल्यही टाकायचं हे भारतभरातलं नियमित दिसणारं दृश्य. झाडं तर किती तोडली असतील गेल्या काही वर्षात, म्हणजे नवीन न लावता, याची गणतीच शक्य नाही. आपली वाहनं किती प्रदूषण निर्माण करतायत, याचा आपण विचारच करत नाही. एकएक माणूस मिळूनच जमाव तयार होतो, एकएक माणसाने प्रयत्न केले पर्यावरण वाचवण्याचे तरच ते मोठं रूप धारण करू शकतात. मी एकटीने करून काय होणारेय, हा प्रश्न “थेंबे थेंबे तळे साचे’ ही म्हण वर्षानुवर्षं शिकणाऱ्या आपल्याला कसा काय पडू शकतो?

    आता वेळ आली आहे आपण प्रत्येकाने आपलं छोटंसं पाऊल टाकण्याची. आपण प्रत्येकाने जमेल तसं पर्यावरण रक्षणाचं, संवर्धनाचं काम करू या, त्याने जो काही इवलुसा फरक पडेल तो तरी पडू दे. आजच्या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने हे आवर्जून सांगावंसं वाटतं. या निमित्ताने तुम्ही काय प्रयत्न करता तेही आम्हाला कळवा. सर्वांनाच त्याचा फायदा घेता येईल.

    mrinmayee.r@dbcorp.in

Trending