आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्‍टोव्‍हची पिन आणसाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मार्चचा शेवट म्हणजे प्रत्येक कर्मचाऱ्याचा वार्षिक परीक्षेचा काळ असतो. प्रत्येकाची नुसती धांदल उडालेली असते. अशीच काहीशी धांदल माझ्या वडलांचीसुद्धा उडालेली होती. एक तर ऐन वयात आलेल्या मुलीकरिता मुलाचा प्रश्न. मुलगा चांगला आहे पण त्याला चांगली नोकरी नाही, नोकरी आहे तर मुलगा वाईट आहे. घरचं टेन्शन, त्यात भर या मार्च एंडची. अचानक २९ मार्चला वडिलांना त्यांच्या बरोबरीच्या अधिकाऱ्याचा फोन आला. बाबांना वाटलं, ऑफिसची काही कामं आपल्याकडे आहेत म्हटल्यानंतर काही म्हणत असतील साहेब. बाबांनी फोन घेतला. पाचेक मिनिटं बोलले असतील त्या कॉलवर. परंतु त्यानंतर त्यांचं टेन्शननी भरलेलं मन अचानक गुणगुणायला लागलं...

‘दुनिया में कितना गम है
मेरा गम कितना कम है।’
मी विचारलं, एवढ्या घाईगडबडीत असताना अचानक गाणं. कसं काय?
बाबांनी सांगितलं, आता ज्या व्यक्तीचा कॉल आला होता ती व्यक्ती माझी वरिष्ठ अधिकारी आहे. त्याला माझ्यापेक्षा दुप्पट पगार मिळतो. परंतु तरी तो घरी सुखी नाही. त्यांनी मला काय म्हटलं ठाऊक आहे?
‘गणेशराव, येताना स्टेाव्हची पिन आणसाल.’
या वाक्यावरून मलाही थोडं हसायला आलं. बाबांनाही हसू फुटलं. दिवस मार्च शेवटीचा आणि हा माणूस स्टोव्हची पिन सांगतोय. बाबांना याचं कारण विचारलं तर, ते भयानक होतं! त्या व्यक्तीला महिन्याला ६०,००० रुपये वेतन मिळतं. त्यामधून त्यांच्या हातावर फक्त १०,००० पडतात आणि त्यातच पाच जणांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवावा लागतो. का? तर त्यांनी कित्येक लोकांकडून, बँकांमधून कर्ज घेतलंय, ते हप्ते फेडण्यातच ५० हजार निघून जातात. दोन मुलं आता लग्नाला आलीत. परंतु एकालाही नोकरी करावी असं वाटत नाही. एवढ्यावर बाबा थांबले. मी विचारलं, ‘अहो बाबा, हे सर्व ठीक आहे. परंतु त्याच्यावर एवढी परिस्थिती उद्भवली तरी कशी?’ तेव्हा बाबा म्हणाले, ‘दारू. चारपाच वर्षं झालीत, त्याच्या परिवाराला त्रास सहन करावा लागतोय. तेव्हा त्याचे डोळे उघडले. आता जरी दारू बंद केली असली, तरी त्रास उरलाच आहे.’ हे एेकून मी फार अस्वस्थ झालो.

 

pawanjaybhaye@rediffmail.com

बातम्या आणखी आहेत...