आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झोका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोमेंट अाॅफ इनर्शिया हे भौतिकशास्त्रातलं तत्त्व शिकवताना झोपाळ्याचा छान उपयोग करून घेता येतो, जेणेकरून विषय समजायला सोपा होतो.

 

"आ ज बिलकुल प्रॅक्टिकल करायचं नाहिये."
"मॅडम, सुट्टी?"
"सुट्टी नाही पण लॅबमध्येच पीटीचा तास आहे असं समजा."
"म्हणजे?"
"आज खेळायचंय..."
"लॅबमध्ये काय खेळणार?"
"झोका..."
ऐकलं की, सगळ्या जणी हसायला लागतात. मॅडम जोक करतायत म्हणून. पण जेव्हा मी दोन दोऱ्यांच्या मदतीने बांधलेला रॉड दाखवते, खुश होतात.
"हो, पण तिथं जायच्या आधी काही प्रश्न. मग उत्तरं आणि मग खेळ. चालेल ना?"
"हो."
"तर मग मला अकरावीत शिकलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. Moment of inertia म्हणजे काय?"
"A measure of the resistance of a body to angular acceleration about a given axis that is equal to the sum of the products of each element of mass in the body and the square of the element's distance from the axis."
"शाब्बास. आता या रॉडचा आपल्याला मोमेंट आॅफ इनर्शिया काढायचा आहे, पण कसा तर झोके देऊन. जसं व्याख्येमध्ये सांगितलं आहे तसंच. एक काल्पनिक अक्ष या रॉडचा ठरवून त्याला ठरावीक कोन येईल अशी गती द्यायची. 


थोडक्यात काय तर हा रॉड दोन दोऱ्यांच्या मदतीनं झोक्यासारखं बांधायचा आहे आणि रॉडची एकच बाजू ओढून सोडायची आहे. लंबकासारखी दोलनं द्यायची म्हणजे रॉडच्या मधोमध आपल्या काल्पनिक अक्षाभोवती angle of acceleration  तयार होईल. आणि 20 oscillations साठीचा वेळ काढायचाय. 


आणि असंच झोके देत प्रॅक्टिकल करायचंय. यावरून moment of inertia कसा काढायचा ते सांगेनच फॉर्म्युला वापरून. मग घरी किंवा कुठल्याही बागेतल्या झोक्याचा moment of inertia काढून आणणार का?"
अर्थातच होकार मिळणार असतो कारण त्या निमित्तानं झोके खेळायला मिळणार असतात ना.
विद्यार्थी शाळेचे असोत वा कॉलेजचे, काही गोष्टी फार जवळच्या असतात, जसा की झोका. हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. तोच कनेक्ट केला की, डोक्यात तो विषय परफेक्ट बसतोच बसतो.

 

प्रियांका पाटील, सोलापूर
pppatilpriyanka@gmail.com

 

बातम्या आणखी आहेत...