Home | Magazine | Rasik | sheshrao more write ‘गांधीहत्या आणि सावरकरांची बदनामी’ book

धादांत खोटे आरोप

शेषराव मोरे | Update - May 27, 2018, 01:00 AM IST

म. गांधींची हत्या ही भारताच्या इतिहासातील एक काळीकुट्ट घटना. या हत्येत सहभाग असल्याच्या आरोपाखाली स्वातंत्र्यवीर सावरकरा

 • sheshrao more write ‘गांधीहत्या आणि सावरकरांची बदनामी’ book

  म. गांधींची हत्या ही भारताच्या इतिहासातील एक काळीकुट्ट घटना. या हत्येत सहभाग असल्याच्या आरोपाखाली स्वातंत्र्यवीर सावरकरांना अटक झाली. त्यांच्यावर खटला चालवला गेला. तेव्हापासून आजतागायत सावरकरांचे नाव गांधीहत्येशी जोडले गेले. परिणामी, सावरकरांचे कर्तृत्व या घटनेने डागाळत राहिले. सावरकरांना न्यायालयाने गांधीहत्येच्या आरोपातून पूर्णपणे निर्दोष ठरविले असताही गेल्या पंधरा वर्षांपासून त्यांना बदनाम करण्याची मोहीम कशी चालू आहे? सावरकरांचा खरोखरच गांधीहत्येत सहभाग होता का? न्यायालयाने सावरकरांबाबत नेमका काय निर्णय दिला? यात तथ्य किती आणि मिथ्या किती? या सर्व प्रश्नांचा कायदा, वास्तव, तर्क व न्यायबुद्धी यांच्या आधारे वेध घेणारे, ‘गांधीहत्या आणि सावरकरांची बदनामी’ हे शेषराव मोरे यांनी लिहिलेले पुस्तक २८ मे २०१८ रोजी राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहे. या पुस्तकातील हा संपादित उतारा...

  मणीशंकर अय्यर यांनी ‘द इंडियन एक्प्रेस’मध्ये (१४ मे २००२) लि हिले होते की, ‘सावरकरांना गांधीहत्येच्या कटात अटक केली होती व आरोपी केले होते, परंतु ‘निःसंशय’ पुरावा नसल्यामुळे (evidence beyond doubt) त्यांना (न्यायाल याकडून) शिक्षामुक्त करण्यात आले.’ अय्यर यांचे हे म्हणणे चूक आहे. निःसंशय पुरावा नसल्यामुळे नव्हे, तर त्यांच्याविरुद्ध कायदेशीर पुरावाच नसल्यामुळे त्यांना निर्दोष ठरविण्यात आले होते. ‘संशयाचा फायदा’ देऊन त्यांना दोषमुक्त व शिक्षामुक्त करण्यात आले नव्हते. ‘बडगे याने दिलेली साक्षसुद्धा सावरकरांचा या कटात हात होता, असे सांगत नाही.’ असा न्यायाल याचा निष्कर्ष होता. तेव्हा हे विरोधक काही तरी चुकीचे वा खोटेनाटे सांगून जनतेच्या मनात सावरकरांच्या निर्दोषपणाविषयी शंका निर्माण करीत असतात.


  प्रफुल्ल बिडवई यांनी ‘नवहिंद टाइम्स’मध्ये (९ सप्टेंबर २००४) लि हिले होते की, ‘सावरकर हे तांत्रिक (technical) कारणामुळे दोषी ठरण्यापासून वाचले; कारण चिकित्सक (?) माफीचा साक्षीदार (a critical approver) (दिगंबर बडगे) याच्या साक्षील ा स्वतंत्रपणे दुजोरा मिळाल ा नव्हता.’ बडगे हा ‘प्रिटिकल ’ होता म्हणजे काय? चिकित्सक, समतोल बुद्धीचा, निःपक्षपाती? कोणता अर्थ घ्यायचा? कायद्याने अत्यावश्यक असणारा ‘दुजोरा’ न मिळणे, हे कारण तांत्रिक असते काय? बिडवई यांनी ल गेच पुढे एक धादांत खोटी माहिती दिली आहे की, ‘परंतु न्यायमूर्ती जी. डी. खोसल ा यांनी (गांधीहत्या प्रकरणातील ) सिमल ा उच्च न्यायाल यातील (अपिल ाचा) निकाल लि हिल ा होता, त्यांनी मात्र सावरकरांच्या सहभागासहित (गांधीहत्या) कारस्थानावर शिक्कामोर्तब केले होते.’ (But Justice G. D. Khosla, who wrote the judgment of the Simla High Court, confirmed the conspiracry, with Savarkar's involvement).’ हे खोटे आहे. सावरकरांना निर्दोष ठरविणाऱ्या विशेष न्यायाल याच्या निकाल ाविरुद्ध फिर्यादी पक्षाने उच्च न्यायाल यात अपील च केले नव्हते किंवा सावरकरही पुन्हा एकदा निर्दोष सुटण्यासाठी उच्च न्यायाल यात गेले नव्हते. तेव्हा कारस्थानातील त्यांच्या सहभागाचा मुद्दाच उच्च न्यायाल यात उपस्थित होऊ शकत नव्हता, झालेल ा नव्हता.


  ‘सिमल ा उच्च न्यायाल य’ नावाचे कोणतेच उच्च न्यायाल य भारतात कधीही अस्तित्वात नव्हते. ज्या उच्च न्यायाल याचा संदर्भ बिडवई यांना अभिप्रेत होता, ते ‘पूर्व पंजाब उच्च न्यायाल य’ होते.
  राजेश रामचंद्रन यांनी ‘आऊटल ूक’मध्ये (६ सप्टें. २००४) लि हिले होते की, ‘(माफीचा साक्षीदार बडगे) याने (गांधीहत्या) कारस्थानातील सावरकरांचा सहभाग असल्याविषयी काही धक्कादायक (startling) माहिती न्यायाल यात सांगितली होती... न्यायाधीश आत्मचरण यांनी ‘माफीचा साक्षीदार बडगे याच्या साक्षील ा दुजोरा नाही’ या तांत्रिक कारणास्तव सावरकरांना सोडून दिले होते. तथापि त्या न्यायाधीशांनी बडगे हा सत्यवचनी साक्षीदार (a truthful witness) आहे, असे मानले होते... तरीही त्यांनी सावरकरांना दोषी ठरविले नाही.’

  रचलेल्या कथा
  अॅड. नुराणी व अशा अनेकांनी इ.स.२००२पासून इंग्रजी भाषेत सतत मांडून ठेवलेल्या व सावरकरांची बदनामी करण्याच्या हेतूने लि हिलेल्या अशा लेखनाची मराठी भाषेत पुनरावृत्ती झालेली दिसेल . ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ यांनी दि. १० सप्टेंबर २०१५च्या ‘लोकमत’मधील लेखात लि हिले होते की, ‘...सावरकर सात प्रमांकाचे आरोपी होते. आठवा आरोपी दिगंबर रामचंद्र बडगे याल ा माफीचा साक्षीदार म्हणून दि. २१ जून १९४८ रोजी न्यायाल यानं मान्यता दिली. त्याची एक आठवडा तपशील वार उल टतपासणी झाली आणि तो विश्वासार्ह साक्षीदार आहे, अशा निष्कर्षाप्रत न्यायाल य आल ं. मगच त्याल ा माफीचा साक्षीदार म्हणून मान्यता देण्यात आली.’


  बडगे याल ा माफीचा साक्षीदार म्हणून मान्यता देण्यापूर्वी त्याची एक आठवडा उल टतपासणी झाली, हे पूर्णतः खोटे आहे. आरोपील ा माफीचा साक्षीदार जाहीर करण्याचा सरकारी अध्यादेश दि. १४ जून १९४८चा आहे. यासाठी फिर्यादी सरकार पक्षाने न्यायाल यात सादर केलेल ा अर्ज १७ जून १९४८चा आहे. दि. २१ जून १९४८ रोजी बडगे याल ा न्यायाल यात हजर करण्यात आले. त्याल ा न्यायाधीशांनी दोन प्रश्न विचारले व ‘पूर्ण व सत्य’ माहिती सांगण्याच्या अटीवर त्याल ा त्याच दिवशी माफीचा साक्षीदार म्हणून न्यायाल याने सशर्त मान्यता दिली. कोणत्याही आरोपीचा वकील न्यायाल यात नव्हता, कारण त्यांना याची माहितीच नव्हती. तेव्हा त्याची आधी उल टतपासणी व त्यात न्यायाल याल ा तो विश्वासार्ह वाटणे व मग मान्यता देणे या साऱ्या मनाने रचलेल्या कथा आहेत.


  विश्वासार्ह म्हणून त्याल ा माफीचा साक्षीदार केले नव्हते, तर ‘पूर्ण व सत्य’ सांगण्याच्या अटीची टांगती तल वार त्याच्या डोक्यावर ठेवून त्याल ा साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभे केले होते. त्याने जर ती अट पाळली नाही, तर त्याच्यावर हत्येच्या कटाचा खटल ा चाल णार होता. आणि त्याने ‘पूर्ण व सत्य’ माहिती सांगणे म्हणजे काय, तर पोलीस आणि त्याच्यात जे काही सांगायचे ठरले होते ते सांगणे होय. (अर्थात पोलि सांनी त्याल ा मॅ जिस्ट्रेटसमोर उभे करून प्रि. प्रो. कोडच्या १६४नुसार त्याचा कबुलीजबाब आधीच घेऊन ठेवलेल ा असणार. त्याल ा त्यापेक्षा साक्षीत वेगळे सांगण्यास वावच नव्हता.)


  प्रकाश बाळ पुढे लि हितात की, ‘न्यायाधीश आत्मचरण दास यांनी १० फेब्रुवारी १९४९ल ा निकाल देताना सावरकर यांच्याविषयी म्हटल ं होतं की, ‘बडगेची साक्ष विश्वासार्ह आहे. पण त्याल ा पुष्टी देणारा जो पुरावा न्यायाल यासमोर सादर करण्यात आल ा, तो निःसंदिग्ध व पुरेसा नाही. यामुळं अशा पुराव्याच्या आधारे सावरकर यांना दोषी मानणं योग्य ठरणार नाही.’ यातील ‘बडगेची साक्ष विश्वासार्ह आहे,’ असे सावरकरांसंबंधी निकाल देताना न्यायाल याने म्हटलेलेच नाही. प्रकाश बाळ यांनी न्यायाल याच्या निकाल ात स्वतःच्या मनाने ते घातलेले आहे. न्यायाल याने सावरकरांसंबंधात काढलेल ा निष्कर्ष व दिलेल ा अंतिम निकाल आम्ही मागे पृ. ४८वर उद्धृत केल ा आहे; त्यासाठीची कारणमीमांसा पृ. ६०वर आली आहे; बडगेच्या साक्षीसंबंधीचे निरीक्षण पृ. ६३वर आले आहे. पण यांपैकी कोठेही किंवा संपूर्ण निकाल पत्रातही ‘बडगेची साक्ष विश्वासार्ह आहे,’ किंवा ‘तो विश्वासार्ह आहे’ असे म्हटलेले नाही. हे उघड दिसते की, ‘विश्वासार्ह साक्षीदार’ हा शब्दप्रयोग अॅ ड. नुराणींच्या ‘truthful witness' (सत्यवचनी साक्षीदार) याचे अनुकरण व वेगळे मराठीकरण आहे.

  म्हणे ‘निर्दोष नव्हे तर पुराव्याअभावी’!
  प्रकाश बाळ ल गेच पुढे लि हितात ः ‘गांधीहत्येच्या कटात सहभागी असल्याच्या आरोपावरून सावरकरांची न्यायाल यानं मुक्तता केली हे खरं. पण त्यांना निर्दोष ठरवलेल ं नाही, केवळ ‘निःसंदिग्ध व पुरेसा पुरावा नसल्यानं’ त्यांची मुक्तता करण्यात आली...’ (लोकमत, दि. १०/९/२०१५) वस्तुतः न्यायाल याने स्पष्टपणे निर्णय दिल ा आहे की, ‘(सावरकर) दोषी आढळले नाहीत व त्यांना (त्यांच्यावरील ) आरोपांतून निर्दोष ठरविण्यात येत आहे.’
  निर्दोष ठरविण्यासाठी यापेक्षा अधिक काय लि हिले पाहिजे? हे ल क्षात घेतले पाहिजे की, कोणतेही न्यायाल य न्यायाल यासमोर आलेल्या वा असलेल्या पुराव्यांच्या आधारेच निर्णय देत असते.

  आरोपील ा निर्दोष ठरविणारा कोणताही निकाल न्यायाल यासमोर त्याल ा दोषी ठरविण्यासाठी पुरेसा पुरावा नाही, असेच कारण देऊन व तशाच शब्दांत लि हिलेल ा असतो. (संशयाचा फायदा देऊन काही आरोपींना मुक्त केले जाते, पण सावरकरांना त्या कारणाने मुक्त केले नव्हते.) कायद्यात म्हणजेच ‘क्रिमिनल प्रोसिजर कोड’च्या कल म २३२ मध्येच, निर्दोष सोडणारा निकाल कसा लि हावा, हे पुढील प्रमाणे सांगितले आहे ः ‘जर... न्यायाधीशांना वाटले की, गुन्हा केल्यासंबंधात आरोपीविरुद्ध कोणताच पुरावा नाही, तर त्यांनी तो निर्दोष असल्याचा निर्णय द्यावा.’ १३ आरोपीविरुद्ध न्यायाल यासमोरच काय जगात कोणताच पुरावा नाही, म्हणून त्या आरोपील ा निर्दोष ठरविण्यात येत आहे - असा निकाल जगाच्या पाठीवरील कोणतेच न्यायाल य देत नाही, हे प्रकाश बाळ यांना खरेच माहीत नसेल काय? सुनील तांबे यांनी ‘मीडिया वॉ च’ दिवाळी अंकात (२०१५) ‘सावरकरांवरील गांधीहत्येचा कल ंक कधीही पुसल ा जाणार नाही’ नावाचा लेख लि हून कायदेपंडित नुराणी व पत्रकार प्रकाश बाळ यांनी केलेल्या आरोपांचीच पुनरावृत्ती केली.

  ते लिहितात ः ‘आरोपी प्रमांक ७ होते, विनायक दामोदर सावरकर. आठवा आरोपी दिगंबर बडगे याल ा माफीचा साक्षीदार म्हणून न्यायाल याने २१ जून १९४८ रोजी मान्यता दिली. एक आठवडा दिगंबर बडगेची तपशील वार उल टतपासणी झाली... तो विश्वासार्ह साक्षीदार आहे अशा निर्णयाप्रत न्यायाल य आल ं. मगच त्याल ा माफीचा साक्षीदार म्हणून मान्यता देण्यात आली... बडगे यांची साक्ष विश्वासार्ह आहे, असा निर्वाळा न्यायमूर्तींनी दिल ा.’ या प्रतिपादनाची प्रकाश बाळ यांच्या वरील लेखनाशी तुल ना करून पाहावी; म्हणजे गांधीहत्या अभियोगाचा मुळातून अभ्यास न करताच एकाचे वाचून दुसरा कसा निराधार प्रचार करीत असतो, हे ध्यानात येईल . (याचा येथील परिणाम म्हणजे, बडगे हा चार प्रमांकाचा आरोपी होता, पण येथे दोघांनीही त्याल ा आठ प्रमांकाचा आरोपी बनविले आहे.)


  बडगे याची साक्ष खरी आहे, असे गृहीत धरले; तरी त्यावरून सावरकरांचा कटात हात होता, हे सिद्ध होत नाही. गोडसे-आपटे यांनी सावरकर सदनाल ा भेट दिली व त्यांना त्यांनी ‘यशस्वी होऊन या’ म्हटले, यापलीकडे अधिक विरोधी बडगे याची दुसरी साक्ष नाही. मूळ साक्ष निश्चित आरोप करणारी असेल ; तरच त्यास अन्य साक्षीचा दुजोरा मिळतो की नाही, हा प्रश्न निर्माण होतो. बडगे याची सावरकरांसंबंधीची साक्ष त्यास दुजोरा मिळतो की नाही, हे पाहण्यासाठीसुद्धा पात्र नव्हती.


  हे नीट ल क्षात येण्यासाठी अशी कल्पना करू की, बडगेसुद्धा गोडसे-आपटेबरोबर सदनाच्या पहिल्या मजल्यावर सावरकरांना भेटण्यासाठी गेल ा होता. तेथे तिघांसमोर गांधीहत्येचा विषय निघून सावरकरांनी त्यांना ‘यशस्वी होऊन या’ म्हटले असते व तसे ऐकल्याचे बडगेने साक्षीत सांगितले असते तर? किंवा जिन्यावरून हे शब्दप्रयोग करताना त्यांनी स्पष्टपणे गांधीहत्येचे सूचन केले असते तर? तरच त्याची साक्ष इतरांचा दुजोरा मिळण्यासाठी पात्र समजता आली असती. तेव्हा त्याची मूळ साक्षच सावरकरांना स्पष्टपणे दोषी धरणारी नव्हती. त्याने स्वतःच साक्षीत मान्य केले होते की, ‘यशस्वी होऊन या’ हे शब्दप्रयोग गांधीहत्येच्या कटाच्या संदर्भात नव्हते.


  तेव्हा सावरकर-विरोधक, न्यायाल याचा स्पष्ट निकाल समोर असतानाही, सावरकरांना दोषी ठरविण्यासाठी पुढील युक्त्या-प्रयुक्त्या करीत असतात. एक ः माफीच्या साक्षीदाराच्या साक्षील ा दुजोरा मिळाल ा नाही, एवढय़ा तांत्रिक कारणासाठीच त्यांना सोडून देण्यात आले. दोन ः त्याच्या साक्षील ा शांताबाई व ऐतप्पा यांच्या साक्षींचा दुजोरा होता, पण तो न्यायाल याने विचारात न घेण्याची चूक केली. तीन ः तो बडगे सत्यवचनी वा विश्वासार्ह साक्षीदार असल्याचे न्यायाल यानेच म्हटले असल्यामुळे त्याच्या साक्षीच्या आधारावर सावरकरांना दोषी ठरवायल ा हवे होते. त्यास दुजोऱ्याची आवश्यकता होती म्हणून त्यांना निर्दोष ठरविणे, ही न्यायाल याची परस्परविसंगती होती. चार ः सावरकरांना निर्दोष ठरविणारा निकाल ातील भाग हे न्यायाधीशांचे अवांतर मतप्रदर्शन होय. पाच ः त्यांना निर्दोष ठरविण्यात आले नसून फक्त पुरेशा पुराव्याअभावी मुक्त करण्यात आले होते. सहा ः सावरकर कटात सहभागी होते, पण ते महाहुशार असल्यामुळे मागे पुरावाच राहू देत नसत; म्हणून न्यायाल यातून सुटले. सात ः फिर्यादी पक्षाल ाच सावरकर निर्दोष सुटावेत, अशी इच्छा होती. त्यांना शिक्षा झाल्यास प्रक्षोभ निर्माण होईल , असे राज्यकर्त्यांना वाटत होते. यासाठी त्यांनी न्यायाल यासमोर पुरावे आणले नाहीत, म्हणून सावरकर निर्दोष सुटले. (हे शेवटचे प्रतिपादन तुषार गांधी यांचे आहे.) थोडक्यात, काहीही करून सावरकरांना गांधीहत्येच्या कटात दोषी ठरविलेच पाहिजे, अशी ही सावरकर-विरोधकांची कटिबद्धता व प्रतिज्ञा आहे.

  - शेषराव मोरे
  rajhansprakashaneditor@gmail.com

Trending