आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्विटरची टिवटिव कशी हाताळाल?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेकांना विविध कारणांमुळे जास्त शब्दांत लिहिणे शक्य नसते. फेसबुक वा इतर सर्व सोशल मीडियापेक्षा ट्विटरवर कमी शब्दांत पोस्ट करावे लागतात. ज्यांना कमी शब्दांत व्यक्त होता येते, ज्यांना वेळेची मर्यादा आहे, अशा सर्वांचेच ट्विटर हे अतिशय आवडते आणि प्रभावी माध्यम बनले आहे. 


जगभरातील प्रसिद्ध व्यक्ती, राजकीय नेते, विविध संस्था आणि कंपन्यांचे प्रमुख यांच्याशी संपर्क करण्याचे ट्विटर हे नवे व्यासपीठ आहे. निवडणूक असो, एखाद्या खेळाचा महत्त्वाचा सामना असो की पुरस्कार सोहळा, त्याचे ट्विटर हँडल असणे आणि ते सक्रिय असणे हे आज सर्वांनी गृहीत धरले आहे. कमीत कमी शब्दांत आपला व्यवसाय, उत्पादन वा ब्रँड लोकांपुढे नेणे हे ट्विटरमुळे सहज शक्य होते. अनेकांना विविध कारणांमुळे जास्त शब्दांत लिहिणे शक्य नसते. फेसबुक वा इतर सर्व सोशल मीडियापेक्षा ट्विटरवर कमी शब्दांत पोस्ट करावे लागतात. ज्यांना कमी शब्दांत व्यक्त होता येते, ज्यांना वेळेची मर्यादा आहे, अशा सर्वांचेच ट्विटर हे अतिशय आवडते आणि प्रभावी माध्यम बनले आहे. 


ट्विटर मॅनेजमेंटचे घटक

कोणत्याही क्लायंटचे/ ब्रँडचे मॅनेजमेंट करताना पुढील गोष्टी ट्विटरवर करणे अपेक्षित आहे.


हँडल : तुमचा ट्विटर अकाउंट म्हणजेच ट्विटर हँडल. त्याचे ब्रँडसुसंगत नाव निवडणे महत्त्वाचे आहे.


प्रोफाइल फोटो : व्यक्ती वा कंपनी लोगोचा वापर प्रोफाइल म्हणून करणे योग्य राहील. 


कव्हर फोटो : कव्हर फोटो म्हणून एखादा इव्हेंट, उत्पादन, काम करण्याची पद्धत याचा वापर करावा. शब्दमर्यादा कमी आहे म्हणून योग्य शब्द वापरण्यावर खूप भर द्यावा लागतो. त्याशिवाय फोटो, व्हिडिअो वा इतर दृकश्राव्य पोस्टचा वापर जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करण्याची गरज भासते.


फोटो, आकृत्या, योग्य आलेख वा आकडेवारी, इन्फोग्राफिक्सचा वापर ट्विटरवर अधिक आहे. सध्या व्हिडिअो हे या माध्यमातले प्रभावी अस्त्र आहे. पेरिस्कोप म्हणजेच ट्विटर लाइव्हसुद्धा लोकप्रिय होते आहे. 


ट्वीट्स : नियमितपणे ट्वीट वा पोस्ट करणे हे काम सोशल मीडिया मॅनेजरचेच आहे. तुम्ही ट्विटर मॅनेज करत असलात तर ब्रँडकरिता अधिकाधिक फॉलोअर्स मिळवणे, तसेच रिट्वीट मिळवणे याकरिता सक्रिय असावे लागते हे तुम्हाला जाणवले असेल. लोकप्रियतेकरिता कोणत्याही ब्रँड वा उत्पादनाला अधिकाधिक फॉलोअर्स असणे महत्त्वाचे आहे. या लोकप्रियतेवर ट्विटरवरचे तुमचे आणि पर्यायाने ब्रँडचे यश अवलंबून आहे. तसेच प्रत्येक ट्वीट किती वेळा पुन्हा ट्वीट (रिट्वीट) केले गेले यावरही एखाद्या उत्पादनाचे वा ब्रँडचे यश ठरते. या दोन्ही बाबी साध्य करण्याकरता मॅनेजरला विविध युक्त्या आणि पद्धती राबवाव्या लागतात. तुमच्या इतर सोशल मीडियापेक्षा ट्विटरवर जास्त फॉलोअर्स असतील, तिथे जास्त प्रतिसाद असेल तर सोशल मीडिया मॅनेजर म्हणून तुम्हालाही ट्विटरकरिता जास्त वेळ राखीव ठेवावा लागेल. वेळेचे नियोजन आणि मॅनेजेरियल कॅलेंडरमध्ये त्यानुसार आखणी करावी.


फीड : तुम्ही ज्यांना फॉलो करता अशा सर्वांचे ट्विटर अपडेट्स या फीडमध्ये दिसतात. तुमच्या व्यवसाय आणि ब्रँडला अनुसरून इतर ट्विटर हँडल्सना फॉलो करा. 


मेन्शन : फेसबुकवर जसे इतर सदस्य वा ब्रँडना टॅग करता येते तसे ट्विटरवर करतात त्याला मेन्शन म्हणतात. अशी मेन्शन्स मिळाली तर तुमचे हँडल अनेकांपर्यंत सहज जाते.


जाहिरात करणे : ट्विटरवरही जाहिरात करणे हे सोशल मीडिया मॅनेजरचे काम आहे. प्रत्येक मीडियावर टीव्हीकरिता केलेली जाहिरात लावणे यात विशेष नाही. पण प्रत्येक माध्यमाची ताकद ओळखून तशी जाहिरात करण्यावर मीडिया मॅनेजरचा भर असावा. ट्विटरवर केलेली जाहिरात ती कोण बघणार आहे यावर अवलंबून राहील. त्याकरिता ट्विटर फॉलोअर्स आणि त्यांची वर्तुळे याचा अभ्यास करणे आवश्यक आहे.


पुन्हा ट्वीट केले जाईल याकरिता काही युक्त्या तुमच्या ट्वीटमध्ये समाविष्ट करा
- कोणत्या वेळी ट्वीट करता ते महत्त्वाचे आहे.
- तुमच्या अनुयायांना पुन्हा ट्वीट करा अशी विनंती करा.
- तुमच्या ट्वीटमध्ये लिंक द्या. ज्या ट्वीटमध्ये दुवा दिला असेल ते जास्त वेळा रिट्वीट केले जाते असे आढळले आहे.
- इतरांच्या ट्वीटला रिट्वीट करा, हा रिट्वीट मिळवण्याचा उत्तम मार्ग आहे.
- ट्वीट कमी अक्षरांचे करा ज्यामुळे लोकांना त्यात त्याचे मत, वा मांडणी करूनही रिट्वीट करायची संधी असेल.
- योग्य प्रमाणात हॅशटॅग वापरा ज्यामुळे रिट्वीट करणे वा शोधणे सोपे जाते.
- कोट्स वापरणे जास्तीत जास्त रिट्वीट होते असे आढळले आहे.


ट्विटर मॅनेजमेंट टूल्स
तुम्ही मोबाइल फोन ट्विटरवर लॉगिन होण्याकरिता वापरत असलात तर एकाच वेळी अनेक ट्विटर अकाउंटवर लॉगिन राहता येते. या ट्विटरने दिलेल्या या सुविधेचा तुम्ही योग्य उपयोग करू शकता. ट्विटर मॅनेजमेंटकरिता स्मार्टफोनचा वापर जास्त करा. फोनवरून रिअल टाइम ट्वीटस करता येतात. 


फेसबुक पेजवर जसे एका वेळी अनेक पोस्ट वेळेआधीच तयार करून मग ठरावीक वेळी प्रकाशित करता येतात तसे ट्वीट्सचे नियोजन आणि प्रकाशन ट्विटरवर करता येत नाही.  


रोज २४ तास जगभरातून लोक ट्विटरवर येत असताना तुमच्या ट्विटरवर सतत काही तरी कृती दिसणे अपेक्षित आहे.  सुटीच्या दिवशी, तुमची रात्र असताना ट्वीट कशी करता येतील? त्याकरिता ट्विटर मॅनेजरची नितांत गरज आहे. शिवाय पाचपेक्षा जास्त ट्विटर अकाउंट/ हँडल्सचे व्यवस्थापन करताना ट्विटर मॅनेजमेंट टूल्स वापरणे अधिक फायद्याचे ठरते. Sprout Social, Hootsuite ही दोन्ही ट्विटर मॅनेजमेंट्साठी उपयुक्त आहेत. 


कोणत्याही नव्या उत्पादनाची, प्रोजेक्टची, टीमची घोषणा करण्याकरिता ट्विटर अतिशय उपयोगी आहे. फेसबुकवर त्याची मोठी पोस्ट करून वर्णन करण्याची संधी सोशल मीडिया मॅनेजरला असते. कोणत्याही नव्या उत्पादनाची, प्रोजेक्टची, टीमची घोषणा करण्याकरिता ट्विटर अतिशय उपयोगी आहे. फेसबुकवर त्याची मोठी पोस्ट करून वर्णन करण्याची संधी सोशल मीडिया मॅनेजरला असते. कोणत्याही सोशल मीडियावर फोटो वा इमेजेस प्रसंगानुरूप असावेत हीच ट्विटरच्या यशाची गुरुकिल्ली आहे.

 

वैयक्तिक वापर कसा करावा?
तुमचा कोणताही व्यवसाय नाही वा तुम्ही सोशल मीडिया मॅनेजर नसलात तरी बातम्या, सेलिब्रिटी न्यूज, प्रसिद्ध व्यक्तींचे ट्वीट्स याकरिता ट्विटरचे सदस्यत्व जरूर घ्यावे. अनेक ब्रँडशी संपर्क करण्यासाठी ट्विटर उत्तम. ग्राहक चळवळ वा उत्पादनांविषयी आपले मत नोंदवण्याकरिताही हा चांगला पर्याय आहे. ट्विटरद्वारे कंपन्या त्याची दखल घेतात असे दिसते. गुगल सर्चमधून काही वेळा एखादी गोष्ट शोधायला जास्त वेळ लागतो त्याविषयी ट्विटरवर पटकन माहिती मिळते असे जाणवले आहे. तेव्हा ट्विटर सर्चसुद्धा माहितीसाठी उपयोगी आहे हे विसरू नये.


- सोनाली जोशी, ह्यूस्टन, अमेरिका
sonali.manasi@gmail.com

बातम्या आणखी आहेत...