Home | Magazine | Madhurima | Sonali Joshi writes about LinkedIn

लिंक्‍डइनचे महत्‍त्‍व

सोनाली जोशी, ह्युस्टन, अमेरिका | Update - Jun 05, 2018, 01:21 AM IST

एखाद्या व्यक्तीला जोडून घेताना त्या व्यक्तीला भेटले असलात तर उत्तमच, अन्यथा ही जोडणी काळजीपूर्वक करावी.

 • Sonali Joshi writes about LinkedIn
  एखाद्या व्यक्तीला जोडून घेताना त्या व्यक्तीला भेटले असलात तर उत्तमच, अन्यथा ही जोडणी काळजीपूर्वक करावी.

  तुमच्या नवनवीन कौशल्यांविषयी इथे लेखन करणे फायद्याचे आहे. निवडक आणि नेमक्या व्यक्तींच्या संपर्काने LinkedIn चा फायदा जास्त मिळतो.


  तुम्हाला नोकरी हवीय, किंवा एखाद्या कंपनीला प्रकल्पासाठी योग्य व्यवस्थापक शोधायचा आहे, अशा वेळी नोकरी शोधणाऱ्या साइटवर आपले नाव नोंदवतात तशाच पद्धतीने LinkedIn वर नाव नोंदवायचे आहे. म्हणजे इथे प्रोफाइल तयार करायचे. जगभरातील व्यवसाय आणि व्यावसायिकांनी एकमेकांशी संपर्क करण्याची वेबसाइट म्हणजे लिंक्डइन. हा एक वेगळ्या प्रकारचा एकाच क्षेत्रावर लक्ष केंद्रित केलेला सोशल मीडिया आहे. तुम्ही उद्योजक आहात तुमच्या प्रकल्पाकरता तुम्हाला काम करण्यासाठी योग्य व्यक्ती हव्या आहेत. अशा वेळी जशी जाहिरात करिअर साइटवर देतात, फोरमवर पोस्ट करतात तसेच लिंक्डइनवर कंपन्या वा तिथले व्यवस्थापक करतात. मायक्रोसॉफ्टने जेव्हा लिंक्डइन विकत घेण्याचे ठरवले तेव्हा सगळ्यांना त्याचे आश्चर्य वाटले होते. त्या वेळी सोशल मीडिया म्हणून ही साइट अगदीच मागे होती. आपल्या माहितीबरोबर इथे सदस्य कालांतराने वेगवेगळे लेख प्रकाशित करू लागले होते. मायक्रोसॉफ्टने येणाऱ्या काळामध्ये हे अतिशय महत्त्वाचे समाजमाध्यम होणार आहे हे लक्षात घेऊनच हे पाऊल उचलले होते. तसेच झालेही. साइट सुरू झाली त्यापेक्षा अतिशय वेगळ्या स्वरूपात किंवा पोस्टिंग, फायरिंग आणि जॉब्ज असेच त्याचे केवळ रूप न राहता इथे लोकांना विविध विषयावर खात्रीशीर आणि योग्य ती माहिती मिळते. एखाद्या क्षेत्रातले उत्तमोत्तम टॅलेंट काय असते, ते काय करतात हे इथे जाणून घेता येतं आणि शिकण्याच्या नव्या संधी प्राप्त होतात. हा मोठा फायदा आहे.

  दोन व्यवसायिकांना कंपन्यांमधले म्हणजे बिझनेस टू बिझनेस अशी देवाणघेवाण लिंक्डइनवर करता येते. बिझनेस डिजिटल मार्केटिंग यामध्ये लिंक्डइनचा हात कोणीही धरू शकत नाही. समजा तुम्ही एखाद्या कंपनीचे मोठ्या उत्पादनाचे प्रमुख आहात, उत्पादन तुम्हाला लोकांपुढे आणायचं असेल लिंक्डइनसारखी दुसरी कुठलीही साइट नाही. प्रत्येक फ्रीलान्सर, तसेच नवीन नोकरी शोधणारे, पहिल्यांदाच नोकरी शोधणारे, नोकरीत कुठलेही बदल करायचे आहेत अशा व्यक्तीने याचे सदस्य असणे खूप आवश्यक आहे. या साइटच्या ठळक बाबी अशा की, त्यावर ट्रोल्स येण्याचे प्रमाण अगदी कमी आहे किंवा नाही म्हटले तरी चालेल.
  फेक न्यूज, फेक प्रोफाइल, ट्रोल्समुळे उगाचच होणारा त्रास या गोष्टी लिंक्डइनवर तुलनेने खूपच कमी प्रमाणात घडतात. हे घडणारच नाही असे नाही, परंतु एखाद्या उद्योजकाची एखाद्या जॉब प्रोफाईलची चौकशी करण्याचे मार्ग किमान मार्ग या साईटवर उपलब्ध आहेत. त्यामुळे फसवणुकीची शक्यता तुलनेने कमी आहे. चुकीचे जॉब पोस्ट करून लोकांनी जाळ्यात अडकण्याची शक्यता इथे कमी आहे. फसवणूक होणारच नाही अशी खात्री कुणी देऊ शकत नाही, परंतु चौकशीअंती तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकता.

  लिंक्डइनचे प्रोफाइल
  एक व्यक्ती म्हणून तुम्ही इथे सदस्यत्व घेता तेव्हा लिंक्डइनचे प्रोफाइल काढताना त्यामध्ये सर्व माहिती अद्ययावत राहील याची काळजी घ्यावी. तुमच्याशी संपर्क कसा करायचा याची योग्य माहिती द्यावी. तुमचं लिंक्डइन profile हा तुमचा रेझ्युमे आहे. नोकरीकरिता तुमची जी कौशल्ये आहेत, तुमची प्रतिमा आहे ती मुळात खरी कशी आहे हे लक्षात ठेवावे. त्याला इथे दुजोरा देणारे सदस्य मिळवावे. वेबसाइटवर वागताना काळजीपूर्वक वागावे. जे नाही ते दाखवण्याच्या प्रयत्नात फसवणूक करत नाही याची खबरदारी घ्यावी.

  लिंक्डइनवर कंपनी पेज
  एक कंपनी म्हणून वा व्यवसाय म्हणून इथे येता तेव्हा कंपनीचे पेज तयार करावे. त्यावर योग्य माहिती भरावी. ती अद्ययावत राहील याची दक्षता घ्यावी. लोगो, संपर्क आणि बेवसाइट याबाबत विशेष काळजी घ्यावी. लिंक्डइन वरचा वावर अधिक चांगला करण्यासाठी लिंक्डइनवर जास्तीत जास्त मित्र जोडा. फेसबुक किंवा इतर सोशल मीडियावर तुमच्या यादीत खूप जण असतील तर कधीकधी त्याचा त्रास होतो परंतु लिंक्डइनमध्ये तुमच्याशी साम्य असणाऱ्या तुमच्या क्षेत्राशी संबंधित लोकांचाच भरणा जास्त असेल, असे लक्षात घ्या. त्यामुळे अशी मंडळी जास्त असली त्याचा फायदाच आहे. जास्तीत जास्त फायदे हवे असतील तर इथे प्रिमियम सदस्यत्व घ्यावे.

  एखाद्याला मैत्रीची विनंती पाठवल्यावर त्याने ती स्वीकारली तर त्याबद्दल आभार मानावे आणि त्यांच्या योग्य संपर्कात राहण्याचा प्रयत्न करावा. तुम्ही ज्या कंपनीत नोकरी करता त्या कंपनीचे प्रवक्ते म्हणून तुमच्याकडे बघितले जाते. तुमचा इथला वावर कंपनीच्या अटीनुसार असेल याची दक्षता घ्यावी. इथे दिलेल्या माहितीने कोणत्याही नियमाचा भंग होणार नाही याची जबाबदारी तुमची आहे. तुमच्या कंपनीच्या प्रतिमेमध्ये चांगली भर घालता येईल असाच वावर असावा. एखाद्या व्यक्तीला जोडून घेताना त्या व्यक्तीला भेटले असलात तर उत्तमच, अन्यथा ही जोडणी काळजीपूर्वक करावी.
  तुमच्या नवनवीन कौशल्यांविषयी इथे लेखन करणे फायद्याचे आहे. तुम्ही जे काही इथे प्रकाशित करतात त्यापैकी कशाला जास्त प्रतिसाद आहे तशा प्रकारचे अधिक लेखन करावे.
  निवडक आणि नेमक्या व्यक्तींच्या संपर्काने लिंक्डइनचा फायदा जास्त मिळतो.

  sonali.manasi@gmail.com

Trending