आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'वजन\'दार भाज्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भरताचं वांगं, सुस्कारा टाकून
हिरव्या ढब्बू मिर्चीशेजारी टेकून बसलं,
आणि पलीकडे बसलेल्या
हळद कुंकू ढब्बू व्हरायटीचं अभिवादन
स्वीकारून विचारात पडलं.
आजकालची तरुण वांगी आणि मिरच्या,
जरा गरम डोक्याचीच.


एकाच्या डोक्यात काळ्या बिया जमतात,
आणि दुसऱ्या इतक्या शीघ्रकोपी,
त्यांना हात लावला की, जळतो.
काय करणार!
सगळी फिटनेसच्या मागे धावणारी.
स्लिम, कमनीय, साइझ झीरो,
बनण्याची धडपड.


हिरवी ढब्बू मिरची दुसऱ्या बाजूला रेलली,
आणि म्हणाली,
आपल्याला देवानी जे दिले आहे,
त्याबद्दल कृतज्ञता मनात ठेवून,
काळ्या आईचा मान ठेवून,
उत्कृष्टपणे मोठे होणे,
आणि आदर्श भाजी बनून स्वयंपाकघरात येणे
हे आमचे ध्येय;
त्यात सौंदर्य वगैरे आम्ही बघत नाही,
ते चवीत असतं.


वांगीबाईंना विचारा,
त्यांना तर विस्तवाची परीक्षा द्यावी लागते,
पण त्या आपले ध्येय लक्षात ठेवून सामोऱ्या जातात.
हळद-कुंकू व्हरायटी ढब्बू मिरच्या,
देठे डोलावून म्हणतात,
"अहो, हल्ली माणसात पण हाच प्रॉब्लेम आहे;
तरुण अति महत्त्वाकांक्षी,
सगळी उत्तरे आताच हवी,
नाही मिळाली की राग राग,
मग मानसिक आणि शारीरिक त्रास.


आपण तर ढब्बू आणि ही भरताची वांगी;
मला तर वाटतं आपण दुधी भोपळ्याचा आदर्श ठेवावा;
किती उंच जायचं ते निसर्ग ठरवतो,
आपण फक्त छान जगायचं असतं.

 

सुरंगा दाते, मुंबई
suranga.date@gmail.com

बातम्या आणखी आहेत...