आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॅकिंगपासून कसे वाचाल?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोशल मीडियामुळे जग जवळ आले तरी त्याचा जपून वापर करायला हवा कारण काही समाजकंटक सोशल मीडियाचा गैरवापर करून कुणाची बदनामी करायलाही मागेपुढे पाहात नाहीत. फेसबुक हॅकिंगचे प्रमाण वाढलेले आहे. फेसबुकचे बनावट अकाउंट बनवून महिलांना अश्लील मेसेज पाठवण्याच्या तक्रारी वाढत आहेत. फेसबुक वापरकर्त्यांची अकाउंट दोन पद्धतीने हॅक होतात.


फिशिंग
यात हॅकर्स फेसबुकच्या लॉगिन पेजसारखे दिसणारे फेक लॉगिन पेज बनवतात. यानंतर हॅकर्स त्या व्यक्तीच्या इमेलवर खोट्या पेजची लिंक पाठवतात, माहितीतल्या  व्यक्तीला स्वतःचा मोबाइल फेसबुकसाठी  वापरण्यास देतात. जेव्हा ती व्यक्ती लॉगिन आयडी, पासवर्ड त्या फेक पेजवर टाइप करते तेव्हा त्याचा ईमेल पत्ता,  पासवर्ड मिळतो. हॅकर अशा रीतीने वापरकर्त्याचा फेसबुक अकाउंट हॅक करतो. फिशिंगचा वापर करून गोपनीय माहिती चोरणे बेकायदा असून दंडनीय अपराध आहे.


कीलॉगर
हॅकर्स विविध सॉफ्टवेअर तसेच फोटोंमधून या प्रोग्रॅमचा प्रसार करतात. हा प्रोग्रॅम यूजरच्या कॉम्प्युटरवर इन्स्टॉल झाल्यानंतर यूजर्सचे सर्व डिटेल्स रिकॉर्ड करतो. यूजर्सचे हे डिटेल्स हॅकर्सला ईमेल पत्त्यावर पाठविले जातात.


काय काळजी घ्याल?
फेसबुक लॉगिन केल्यावर होमपेजच्या उजव्या बाजूलाअसलेल्या सेटिंग्जवर क्लिक करा. त्यामध्ये General, Security and Login, Privacy, Timeline and Tagging असे options असतील. तिथे Security and Loginवर क्लिक केल्यावर Setting Up Extra Security या पर्यायात असणाऱ्या Use two-factor authentication वर क्लिक करून तिथे तुमचा मोबाइल नंबर द्या ज्यावर फेसबुक लॉगिन करताना एक कोड येईल. तो कोड आणि तुमचा फेसबुकचा पासवर्ड हे दोन्हीही वापरूनच तुम्ही फेसबुक लॉगिन करू शकाल.


सायबर कायदा काय म्हणतो?
अश्लील व आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याबद्दल भारतीय दंड विधानाच्या २९२ कलमान्वये गुन्हा दाखल होऊ शकतो. त्या अंतर्गत दोन ते पाच वर्षांचा तुरुंगवास आणि दंड अशी शिक्षेची तरतूद आहे. माहिती तंत्रज्ञानाचे कलम ६६ हे संगणकाशी संबंधित गुन्ह्यांसाठी वापरले जाते. आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याबद्दल ६६ ए कलमान्वये तीन वर्षं तुरुंगवास आणि दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. ‘आयडेंटिटी थेफ्ट’ म्हणजे ‘वैयक्तिक संवेदनशील माहिती’ची चोरी व गैरवापर केल्याबद्दल ६६ सी कलमान्वये तीन वर्षे तुरुंगवास आणि एक लाख रुपये दंडापर्यंतची शिक्षा होऊ शकते.


‘प्रायव्हसी’च्या उल्लंघनाबद्दल ६६ इ कलमान्वये तीन वर्षे तुरुंगवास आणि दोन लाखांपर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते. आक्षेपार्ह लैंगिक कृत्य किंवा मजकूर प्रसारित वा प्रकाशित केल्याबद्दल ६७ ए कलमान्वये पाच ते सात वर्षे तुरुंगवास आणि दहा वर्षे दंडाची शिक्षा होऊ शकते. अल्पवयीन मुलांचे आक्षेपार्ह लैंगिक कृत्य किंवा मजकूर प्रसारित केल्याबद्दल ६७ बी कलमान्वये पाच ते सात वर्षे तुरुंगवास आणि दहा लाख रुपये दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे.


- योगेश हांडगे, पुणे
handgeyogesh@gmail.com

बातम्या आणखी आहेत...