Home | Magazine | Rasik | divya marathi book review in rasik

ब्लर्ब: शांतता शोधणाऱ्या कविता

दिव्य मराठी | Update - May 06, 2018, 02:48 AM IST

वा स्तवाला भिडू पाहणारा अाणि अापल्या अस्तित्वाबद्दल चिंतन करायला लावणारा ज्ञानेश्वर मुळे यांचा ‘सकाळ... जी हाेत नाही ’ ह

 • divya marathi book review in rasik

  वा स्तवाला भिडू पाहणारा अाणि अापल्या अस्तित्वाबद्दल चिंतन करायला लावणारा ज्ञानेश्वर मुळे यांचा ‘सकाळ... जी हाेत नाही ’ हा काव्यसंग्रह. या काव्यसंग्रहातील प्रत्येक कविता वाचकाला अधिक खाेलात घेऊन जात चिंतनशील बनवते. सातत्यानं बदलणारे जीवन प्रवाह, हिंसा, राजकारण, समाज, देश, धर्माबद्दलच्या मानवी जाणीवांबद्दल अगदी साेप्या शब्दात त्यांनी या कवितेद्वारे भाष्य केले अाहे.

  जगणं सुसह्य करण्याच्या नादात अापण कुठेतरी हरवत चालल्याची खंत त्यांनी त्यांच्या ‘काेणाशी तरी जाेडलं जाण्याच्या प्रतीक्षेत’ या कवितेतून व्यक्त केली अाहे. सर्वत्र नकारात्मकता असताना काहीतरी चांगलं हाेऊन नवी किरणं अंगावर पडतील, असा आशावादही त्यांच्या लेखणीतील वेगळेपण सिद्ध करणारा अाहे. कॅलेंडरच्या तारखांवर पाय देऊन पुढे चालताना स्मरणातील काही काळजावर घाव घालणारे प्रसंग त्यांच्यातील सहृदय माणसाला अापल्यासमाेर ठेवतात. समाजात हाेत असलेल्या हिंसेबद्दल त्यांची कविता वाचकाला खूपच अंतर्मुख करते. एका मानवाच्या जमातीत अाता नवनव्या भिंती निर्माण हाेत असल्याची खंतही अस्वस्थ करून जाते. सुखाचा शाेध घेणारा माणूस भेद अन् हिंसेच्या चक्रव्यूहातून कधी बाहेर पडेल, हा प्रश्न मुळे यांनी या काव्यसंग्रहातील अनेक कवितेतून उपस्थित केला अाहे.

  पुढील स्लाईडवर वाचा , इतर पुस्तकांविषयी .....

 • divya marathi book review in rasik

  अंतर वाढत चालल्याची भावना

   

  ज्ञानेश्वर मुळे यांनी अनुवादित केलेला दुसरा काव्यसंग्रह म्हणजे, ‘श्रीराधा’. रमाकांत रथ नावाच्या अाेरिया कवीचा हा काव्यसंग्रह. मानवी संवेदना बाेथट हाेत चालल्याचे भाष्य त्यांनी या काव्यसंग्रहातील अनेक कवितांमधून केले अाहे. मनाची घालमेल, माणसं -माणसांपासून दुरावत चालल्याच्या भावना, नात्यांची गुंफण त्यांनी केली अाहे. साठ कवितांच्या या संग्रहातून सहजतेनं व्यक्त हाेताना त्यांनी आशयघन विचार मांडण्याचा प्रयत्न प्रत्येक कवितेत केला अाहे. संवाद थांबल्यामुळे माणसा-माणसांमधील अंतर वाढत चालल्याची भावनाही त्यांनी यात व्यक्त केली अाहे.  

  संकलन : सचिन कापसे

   

   पुढील स्लाईडवर वाचा , इतर पुस्तकांविषयी 

 • divya marathi book review in rasik

  पैठण व पैठणीविषयी सर्व काही

   

  स्थानिक इितहासलेखन हे अॅनाल्स परंपरेचे फलित असून याच परंपरेतील  इतिहास संशोधक डॉ. रा.श्री. मोरवंचीकर यांच्या दक्षिण काशी-पैठण या प्रसिध्द ग्रंथाची दुसरी आवृत्ती तब्बल ४० वर्षांनी ‘प्रतिष्ठान ते पैठण’ या नावाने प्रसिध्द झाली आहे. हा ग्रंथ म्हणजे डॉ. मोरवंचीकरसरांंच्या पैठण विषयक केलेल्या संशोधनाचे (paithan through the ages) सार होय. प्रस्तुत ग्रंथ आठ प्रकरणात विभागलेला असून यात सातवाहन व पैठणचा अतूट संबंध पैठणच्या इतिहासाची साधने, सातवाहन शासकांच्या कार्यकाल, पैठणची धार्मिक वाटचाल, अर्थ-वाणिज्य-व्यापाराची समृध्द परंपरा, लोकजीवनाचे पैलू इत्यादीविषयक सविस्तर माहिती आलेली आहे. येथील वस्त्रोद्योगाची सविस्तर चर्चा केलेली आहे. प्रतिष्ठान हे दक्षिण भारतातील एक महत्त्वाचे धार्मिक व सांस्कृतिक पीठही होते. नाथ मंदिर, तीर्थस्तंभ, काष्ठ काम, सातवाहन शासकांच्या नाण्यांची चित्रे आणि पैठणी निर्मिती प्रक्रियेची रंगीत छायाचित्रे यांच्या समावेशामुळे ग्रंथाचे समृद्धी मूल्य वाढले आहे.


  प्रा. श्रीनिवास सातभाई, शासकीय कला कॉलेज, अमरावती

Trending