Home | Magazine | Madhurima | madhurima article about pandharpur

जाता पंढरीसी...

मधुरिमा | Update - Jul 24, 2018, 06:49 AM IST

चतुर्मासात पंढरपुरात भाविकांचे लोंढे येत असतात. या काळात पंढरपुरात वेगवेगळ्या वस्तूंचा मोठा व्यापार होतो.

 • madhurima article about pandharpur

  आषाढीची वारी काल पंढरपूरला पोचली आणि या छोट्याशा परंतु अपार सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक वारसा जपणाया या लहानशा गावात चैतन्याची लाट उसळली. चतुर्मासात पंढरपुरात भाविकांचे लोंढे येत असतात. या काळात पंढरपुरात वेगवेगळ्या वस्तूंचा मोठा व्यापार होतो. पंढरपुरी कुंकू, घोंगड्या, टाळ, झांजा, ढोलकी, पताका, देवपूजेचं साहित्य, मूर्ती, कापडचोपड, कुरमुरे, लाह्या, यांची प्रचंड विक्री होते. इतकंच नव्हे तर घोड्यांचाही मोठा बाजार इथे भरतो. या आगळ्यावेगळ्या पंढरपूरची एक सैर आजच्या अंकात घडवून आणतोय.


  पंढरीची वारी जयाचिये कुळी । त्याची पायधुळी लागो मज ॥१॥
  तेणे त्रिभुवनी होईन सरता । नलगे पुरुषार्था मुक्ति चारी ॥२॥


  असं आर्जव वारकरी करत असतात आणि मजल दरमजल करत ते पंढरपूरला येऊन पोचतात. या वारकऱ्यांसाठी ही पंढरी तयारच असते. वारकऱ्यांना विठूमाउलीचं दर्शन हे सर्वात मोलाचं, पण त्याचबरोबर इतरही गोष्टींची खरेदी त्यांना खुणावत असतेच. वर्षभरातली ही वैशिष्ट्यपूर्ण खरेदी असते, जिच्यासाठीही पंढरपूर प्रसिद्ध आहे. बायकांना इथलं कुंकू हवं असतं, इथे ठरावीक बाईकडून बांगड्या भरताना तिच्याशी वर्षभराच्या गुजगोष्टीही होत असतात. टाळ आणि झांजा घ्याव्या तर इथनंच, असा अनेकांचा नियम असतो. अनेकजण दगडी/संगमरवरी मूर्तींसाठी आॅर्डर देतात, आणि नंतर येऊन घेऊन जातात.

  ही वैशिष्ट्यपूर्ण खरेदी...

  >पंढरपूरला येणाऱ्या भाविकांना ढोलकी, तबला इत्यादि तालवाद्यं, आणि भजनासाठी लागणारी इतर वाद्यंही खरेदी करायची असतात, त्यासाठी वर्षभर काम सुरू असतं.

  >छोट्या छोट्या गावांमधून वारीच्या निमित्ताने पंढरपूरला येणाऱ्या बायकांसाठी दागिन्यांची खरेदी महत्त्वाचीच असते. तर चतुर्मासात भाविकांकडून फुलं, हार यांचीही मोठी मागणी असते.

  >पंढरपुरात आल्यानंतर चंद्रभागेच्या तीरी जाणं अपरिहार्यच. तुळशीमाळ गळा, कर ठेवुनि कटी असं ज्या पांडुरंगाचं वर्णन केलं जातं, त्याच्या या पंढरीत तुळशीमाळा तर असतातच, परंतु इतरही अनेक प्रकारच्या माळा, धागेदोरे, कपडे, चादरी, विठ्ठलाच्या मूर्ती, याही घेण्यासाठी भक्तांची गर्दी होते. त्यामुळं दुकानं या रंगबिरंगी सामानानं खचाखच भरलेली असतात.

  >चंद्रभागेत स्नान केल्याशिवाय पंढरपूरची वारी पुर्ण होत नाही. आणि तुळशी माळही हवीच वारकऱ्याकडे. इथे येणाऱ्या बायका फक्त स्वत: बांगड्या भरत नाहीत तर घरच्या लेकी -सुना - नातींसाठीही आवर्जून घेऊन जातात. एखादी बांगडी टिचली तर ती जोडून घेण्याची सोय तिथेच उपलब्ध असते हेही महत्त्वाचं.

  पुढील स्लाइडवकर क्लिक करून पाहा छायाचित्रे....

 • madhurima article about pandharpur
  सर्व छायाचित्रे : शुभांगी जोशी
 • madhurima article about pandharpur
 • madhurima article about pandharpur
 • madhurima article about pandharpur
 • madhurima article about pandharpur
 • madhurima article about pandharpur
 • madhurima article about pandharpur
 • madhurima article about pandharpur
 • madhurima article about pandharpur
 • madhurima article about pandharpur
 • madhurima article about pandharpur
  >पंढरपूरला येणाऱ्या भाविकांना ढोलकी, तबला इत्यादि तालवाद्यं, आणि भजनासाठी लागणारी इतर वाद्यंही खरेदी करायची असतात, त्यासाठी वर्षभर काम सुरू असतं.
 • madhurima article about pandharpur
 • madhurima article about pandharpur
 • madhurima article about pandharpur
  चतुर्मासात भाविकांकडून फुलं, हार यांचीही मोठी मागणी असते.
 • madhurima article about pandharpur
 • madhurima article about pandharpur
 • madhurima article about pandharpur
 • madhurima article about pandharpur
 • madhurima article about pandharpur
 • madhurima article about pandharpur
  छोट्या छोट्या गावांमधून वारीच्या निमित्ताने पंढरपूरला येणाऱ्या बायकांसाठी दागिन्यांची खरेदी महत्त्वाचीच असते.
 • madhurima article about pandharpur

Trending