Home | Magazine | Rasik | shridhar deshpande write on karl marx

मानवतेचा प्रज्ञावंत उद्धारकर्ता

श्रीधर देशपांडे | Update - May 06, 2018, 01:41 AM IST

अमीर-उमराव, राजे-महाराजे यांनी आकारास आणलेली व्यवस्था उद्ध्वस्त करून नव्या जगाची श्रमकेंद्री मांडणी करणारा कार्ल मार्क्स

 • shridhar deshpande write on karl marx

  अमीर-उमराव, राजे-महाराजे यांनी आकारास आणलेली व्यवस्था उद्ध्वस्त करून नव्या जगाची श्रमकेंद्री मांडणी करणारा कार्ल मार्क्स हा अद्वितीय प्रज्ञावंत होता. त्याच्या प्रज्ञेने जगाची दिशा बदलली. धर्म-पंथांच्या आधी त्याने मानवी श्रमाची किंमत जोखली. पण म्हणून तो धर्म किंवा परमेश्वरविरोधी होता? लोकशाहीविरोधी होता? ५ मे रोजी द्विजन्मशताब्दी वर्षाची सांगता होत असताना मार्क्सच्या विचारांचा सम्यक वेध घेणारा हा लेख...

  ल्या सहस्रकातील सर्वात महान बुद्धिमान माणूस कोण? यासाठी १९९९ मध्ये बी.बी.सी. या जगप्रसिद्ध दूरसंचार संस्थेने मतचाचणी घेतली. त्यामध्ये हेगेल, कांट, डेकार्ट, बेकन अशा थोर तत्त्ववेत्त्यांबरोबरच न्यूटन, आइन्स्टाइन,कार्ल मार्क्ससारख्या शास्त्रज्ञांची नावेही देण्यात आली. बहुसंख्य वाचकांनी मार्क्सच्या बाजूने मते दिली. त्याच वेळी लेखन क्षेत्रासाठी सर्वात थोर लेखक म्हणून वाचकांनी शेक्सपिअरला निवडले. १९९०च्या सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर आठ वर्षांनी वाचकांनी मार्क्सला पहिला क्रमांक द्यावा, ही गोष्ट आश्चर्यकारक असली तरी स्वयंस्पष्ट आहे.


  जगभरच्या वाचकांनी मार्क्सला सर्वात जास्त का व कशामुळे मते दिली असतील, यांचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न केला, जर दोन-तीन मुद्दे असे मांडता येतील. मार्क्सच्याच भाषेत सांगायचे तर History extols those men, who have worked for mankind; ज्यांनी मानवजातीसाठी कार्य केले आहे, त्यांचीच इतिहास प्रशंसा करतो, हा पहिला मुद्दा. मुद्दा क्रमांक २. मार्क्सच्या निधनानंतर (१८८३)स्मशानभूमीत जमलेल्यांसमोर दुसरे तत्ववेते एंगल्स काय म्हणाले? "ज्याप्रमाणे डार्विनने जीवित निसर्गाच्या विकासाचा नियम शोधून काढला. त्याप्रमाणे मार्क्सने मानवाच्या विकासाच्या इतिहासाचा नियम शोधून काढला. मार्क्स अगोदरच्या विचारधारांनी एक साधी सोपी गोष्ट झाकोळली होती. ती म्हणजे, कलेचा व्यासंग करणे, राजकारण करणे, तत्वज्ञानाचा अभ्यास करणे-सत्तेसंदर्भात लढणे-धर्माचे आचरण करणे, या सर्वाअगाेदर माणसाला अन्न, वस्त्र आणि हाताला काम मिळायला पाहिजे. हाच विचार घेऊन मार्क्सने इतिहासाचा पाया रचला. तिसरा मुद्दा म्हणजे, मार्क्स याचे त्यागपूर्ण जीवन. मार्क्स हा केवळ आरामखुर्चीत बसून तत्त्वज्ञान लिहिणारा विचारवंत नव्हता, तर चळवळ करणारा क्रांतिकारी कार्यकर्ता म्हणूनही तो अत्यंत त्यागी जीवन जगला. खरं तर मार्क्स सधन कुटंुबातला होता. म्हटले, तर ही सारी उठाठेव करण्याची त्याला काही गरज नव्हती.

  तरीसुद्धा क्रांतिकारी चळवळीसाठीच ४०-५० वर्षे दररोज पहाटे ३-४ वाजेपर्यंतचा अभ्यास, तसेच कॅपिटल ग्रंथ ३, सिलेक्टेड वर्क्सचे ग्रंथ इ. चे लिखाण अफाट अभ्यास, व वाचन मार्क्सने केले. प्रखर बुद्धिमत्ता आणि गरीब कष्टकऱ्यांबद्दल बांधिलकी याशिवाय हे शक्य आहे का? अशी प्रभावी न्याय्य पार्श्वभूमी असताना मार्क्सवादावर जगभर टीका होते. ती कशामुळे? मार्क्सने सुरुवातीलाच सांगितले की, जगातील पूर्वीच्या सर्व समाजाचा इतिहास ‘जुलूम करणारे आणि जुलूम सोसणारे’ यातील संघर्षाचा इतिहास आहे.आता मार्क्सवादाने पिळवटलेल्यांची कणखरपणे बाजू घेतली, तर त्यावर जुलमी बाजूकडून चौफेर टीका होणारच. आजच्या समाजातही कारखानदार हे कामगारांना कमीत कमी वेतन देऊन त्यांच्या श्रमावर (शोषणावर) श्रीमंत-गर्भश्रीमंत आहेत आहे, हे स्पष्ट आहे.


  तथापि, विरोधकांच्या मार्क्सवादावरच्या टीकेला बळी पडून सामान्य लोक टीकेचे खंडन करण्यात कमी पडताना आढळतात. मार्क्सवाद धर्म, देव व लोकशाही मानत नाही, ही त्यातली एक टीका आहे. धर्मासंदर्भात मार्क्स म्हणतो, दारिद्र्य वा सांसारिक दु:खात धर्माचे आचरण माणसाला काल्पनिक का होईना आधार देते. आपले भले होईल, असे त्याला वाटते. तो या आनंदात राहतो. हृदयशून्य जगाचे, धर्म हे हृदय आहे. नि:श्वास आहे. त्याच्यावर हजारो वर्षांचा पगडा आहे. धर्म रद्द केल्याचा प्रयत्न केला, तर त्याचा "खरा आनंद' हिरावून घेतल्यासारखे होईल. म्हणून त्याचा आनंद हिरावून घेऊ नका.

  धर्मआचरणाचे सर्वांना स्वातंत्र्य आहे. भौतिकवाद हा जो मार्क्सवादाचा पाया आहे, हे त्याला एकदम पचणार नाही. लेनिनही म्हटले आहे की, धर्म व त्याचे आचरण ही प्रत्येकाची खासगी बाब आहे. पण शासकीय, क्षेत्रात मात्र शासनाची भूमिका धर्मनिरपेक्ष राहिली पाहिजे. देवाच्या भक्तिबाबतही मार्क्सवादाची अशीच भूमिका आहे. ही प्रत्येकाची खासगी बाब आहे,असे तो मानतो. जसे मैलोन््मैल विठोबाच्या दर्शनासाठी चालत जाणाऱ्या वारकऱ्याला त्याचा आनंद घेऊ द्या. तथापि आम्ही निरीश्वरवादी आहोत, असे पक्ष घोषित करत नाही. (संदर्भ लेनिन समग्र ग्रंथ १०) भक्तांना पक्षात प्रवेशही नाकारत नाही. आपल्या देशातही तेच धोरण आहे. मार्क्सवाद लोकशाही मानत नाही, या टीकेसंदर्भात लेनिनने सांगितले आहे,की भांडवलशाही देशामध्ये रूढार्थी म्हणून ओळखली जाणारी (Democracy in General) नसतेच. तर तेथे कारखानदार-धनिकांची लोकशाही असते. त्यांना पैसा कमावण्यासाठी, प्रसारमाध्यमे विकत घेण्यासाठी, त्याद्वारे जनतेचे मत आपल्या बाजूने वळवण्यासाठी लोकशाही लागते. पुढे लेनिन सांगतो की, इतिहास आम्हाला शिकवतो की, जुलमी राजवटीविरुद्ध उठाव केल्याशिवाय पिळवटलेल्यांना (Oppressed) कोठेही सत्ता मिळालेली नाही. ती मिळाल्यानंतर टिकवण्यासाठी हुकूमशाही पावले उचलावी लागतात. पण ती तशी पावले म्हणजे, रूढार्थी (Dictatorship in General) म्हणणे हास्यास्पद आहे. (संदर्भ : लेनिन कम्युनिस्ट इंटरनॅशनल, मॉस्को १९१९) आपल्या देशातील कम्युनिस्ट पक्ष हादेखील देशाच्या संविधानाबद्दल व लोकशाही समाजवाद धर्मनिरपेक्षतेवर निष्ठापूर्वक बांधिलकी व्यक्त करतो. पक्षांतर्गत लोकशाहीचा उल्लेखही घटनेत करतो (संदर्भ मा.क.प.घटना) क्रांती ही पुढारी वा नेते करत नाहीत-क्रांती लोक करतात-त्यांचे तसे सामाजिक मन झाल्यानंतरच करतात.

  (संदर्भ:मार्क्स ऐतिहासिक भैातिकवाद) वरील विवेचनावरून हे निश्चित दिसते,की मार्क्सवादावर होणारी टीका वस्तुस्थितीला धरून नाही. तसेच विविध देशातील सांस्कृतिक-परंपरा-चालीरीतीचे जतन करणे गरजेचे आहे. कारण, लोकांना अमूर्त (Abstract)भौतिकवाद एकदम पचणारा नाही.(संदर्भ-माओ सिनिफिकेशन ऑफ मार्क्सिझम)कामगाराला जितका जितका कमी पगार दिला जाईल, तितका तितका मालकाचा नफा वाढत असतो.नफ्यासाठी मालक उद्योग-कारखाने काढत असतो. अॅडम स्मिथ, रिकार्डो अशांच्या अर्थशास्त्रांचा अभ्यास करून नंतर स्वत:चे शास्त्र मांडून मार्क्सने वरकड मूल्याचा सिद्धांत मांडला. कामगारांचे कसे प्रचंड शोषण होत राहते, हे दाखवून दिले.

  शेत मजुरांची तीच परिस्थिती दाखवून भांडवलशाही समाजव्यवस्था ही कामगारांच्या शेाषणावर अवलंबून आहे, हे दाखवून दिले. कामगारांचे रूपांतर गुलामगिरीत होते, म्हणूनच मार्क्सला समाज बदलायचा आहे. हे स्वप्नरंजन नसून, इतिहासाच्या अभ्यासातून मार्क्सने दाखवून दिले की, समाज बदलत आला आहे. इतिहासाचे टप्पे म्हणजे, आदिम समाज, गुलामगिरी, जुलमी सरंजामशाही नंतर आताची कामगारांना पिळून काढणारी शेाषण करणारी भांडवलशाही. तिला आता बदलावयाचे आहे. मार्क्सवादाचा आग्रह हा समाज परिवर्तनाचा आहे. गरीब, कष्टकरी, कामगार, आत्महत्या करावे लागणारे शेतकरी यांची एक प्रकारच्या गुलामगिरीतून मुक्ती करण्याची वेळ आली आहे. मार्क्सचे हे म्हणणे आज तंतोतंत लागू आहे.


  आज जगभर आणि देशात भांडवलशाहीने राक्षसी हाहाकार माजवला आहे, ‘ऑक्सफॅम’चा ताजा रिपोर्ट सांगतो, की जगातल्या ७१ टक्के गरीब लोकांकडे जगातली फक्त ३ टक्के संपत्ती आहे. तर ८ टक्के श्रीमंत लोकांकडे आहे ८४ टक्के संपत्ती, जगातल्या लोकसंख्येच्या निम्याहून अधिक असलेल्या ३६० कोटी लोकांकडे जितकी संपत्ती आहे. तितकीच संपत्ती फक्त आणि फक्त ८ व्यक्तींकडे आहे. याच अहवालानुसार २०१७ मध्ये आपल्या देशामध्ये जेवढी संपत्ती निर्माण झाली, त्याच्यातील ७१ टक्के संपत्ती १ टक्के लोकांनी साठवली आहे. अर्थशास्त्राच्या अभ्यासातून म्हणून मार्क्सने सिद्धांत मांडला, की भांडवलशाहीत मधून मधून मंदी येणारच. १९३०च्या महामंदी नंतर २००८ मध्ये पुन्हा अमेरिकेत आलेल्या मंदीपासून जग अजून सावरलेले नाही. ‘ऑक्सफॅम’च्या वरील अहवालात भरीत भर म्हणजे, ही मोठी मंदी गुलामगिरी नाहीतर काय म्हणायचे? माणुसकी हे मूलगामी तत्वज्ञान असलेल्या मार्क्सवादाला हे धरून आहे का? गुलामगिरीच्या बेड्या तोडण्यासाठी मार्क्सची हाक म्हणून रास्त आहे.

  हाच एक निष्कर्ष आहे. सरतेशेवटी सावित्रीबाई फुल्यांच्या "तयास मानव म्हणावे का’? कवितेतल्या चार पंक्ती बघा-
  गुलामगिरीचे दु:ख नाही । जरा ही त्यास जाणवत नाही ।
  माणुसकी ही समजत नाही । तयास मानव म्हणावे का ।

  - कॉम्रेड श्रीधर देशपांडे (लेखक मा.क.प.चे जेष्ठ नेते आहेत)

  - संपर्क ९४२२७७२२३१)

Trending